एक्स्प्लोर

प्लॉट बघण्यासाठी गेलेल्या महिलेचा आधी पाठलाग, नंतर विनयभंग; स्थानिकांनी तरुणाला जागेवरच चोपला

महिला कुटुंबीयांसह प्लॉट पाहण्यासाठी गेले होते .प्लॉट पाहण्यासाठी सर्व सदस्य रस्त्यावर उभे असताना दोन तरुण कार्ड ओरड करत त्या ठिकाणाहून जात होते

Chhatrapati Sambhajinagar Crime:  छत्रपती संभाजीनगरमधून वारंवार गुन्हेगारी घटना समोर येत असताना संतापजनक प्रकार घडलाय .कुटुंबासोबत प्लॉट बघण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा पाठलाग करत भर रस्त्यावर  विनयभंग केलाय . महिलेने आरडाओरड करताच संतप्त स्थानिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला आहे . 19 वर्षांचा आरोपी तरुण छत्तीसगडचा रहिवासी असल्याचं कळतंय . या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती . छत्रपती संभाजीनगरच्या गोळेवाडी परिसरात भर दुपारी हा प्रकार घडलाय .

नेमकं घडलं काय ?

छत्रपती संभाजीनगरमध्ये  गोळेवाडी परिसरात प्लॉट बघण्यासाठी गेलेल्या तरुणीचा एका तरुणाने पाठलाग करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे .अभिषेक रामफल कैवत्य ( वय 19) असे आरोपीचे नाव असून हा तरुण छत्तीसगडचा रहिवासी असल्याचं समोर येत आहे .विवाहित महिलेच्या मैत्रिणीला प्लॉट खरेदी करायचा असल्याने पीडित महिला कुटुंबीयांसह प्लॉट पाहण्यासाठी गेले होते .प्लॉट पाहण्यासाठी सर्व सदस्य रस्त्यावर उभे असताना दोन तरुण कार्ड ओरड करत त्या ठिकाणाहून जात होते .यातील एका तरुणाने विवाहितेच्या मागे जात तिची छेड काढली .

या घटनेनंतर महिलेने आरडा ओरड करतात आजूबाजूच्या स्थानिकांनी धाव घेत विनयभंग करणाऱ्या तरुणाला पकडत त्याला चांगलाच चोप दिला . पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगड येथील रहिवासी असणारा हा तरुण काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात मोलमजुरी करून उपजीविका भागवतो . या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपी तरुणाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे .

बायकोला म्हणाला तासाभरात घरी येतो अन्..

छत्रपती संभाजीनगरात एका उद्योजकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी टोल नाक्याजवळील पुलाखाली सागर रामभाऊ परळकरयांचा मृतदेह सापडला. सागर परळकर हे वाळूज एमआयडीसीतील पुष्पक ऍग्रो कंपनीचे संचालक होते. मृतदेहाजवळ त्यांची दुचाकी अपघातग्रस्त स्थितीत आढळून आली. त्यांच्या मोबाईल व आधार कार्डवरून ओळख पटवण्यात आली. सागर परळकर रविवारी दुचाकीने कन्नडकडे गेले होते. घरी जाण्याआधी पत्नीला फोन करून “मी तासाभरात पोहोचतो” असं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर ते परतलेच नाहीत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास करोडी टोलनाक्याजवळील पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या अवस्थेवरून नेमकं हे अपघात आहे की घातपात, यावर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget