एक्स्प्लोर

आधी हात धरला, मग मोबाईल नंबर मागितला; स्मार्ट सिटी बसमध्ये कंडक्टरचं विद्यार्थिनीसोबत विचित्र कृ्त्य

Chhatrapati Sambhaji Nagar News: या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, स्मार्ट सिटीच्या बसमधून महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीबरोबर बसच्या कंडक्टरने अश्लील चाळे केल्याचा प्रकार घडला आहे. एवढंच नाही तर पीडित मुलीचा हात धरून तिच्याकडे मोबाईल क्रमांकाची मागणी केली. तसेच सोबत आईस्क्रीम खाण्यासाठी येण्याचा आग्रह धरला. शेवटी तरुणीने आरडाओरडा करत बस थांबवली आणि आपली सुटका करून घेतली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

19 वर्षीय पीडित मुलगी कॉमर्स शाखेच्या पहिल्या वर्षात शिकते. महाविद्यालयात जाण्यासाठी ती रोज आपल्या मैत्रिणींबरोबर स्मार्ट सिटीच्या बसमधून प्रवास करायची. दरम्यान, 13 एप्रिल रोजी देखील महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी ती सिडको बसस्थानकाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसली. यावेळी बसमध्ये चालक, कंडक्टर वगळता तीन प्रवासी होते. त्या दिवशी तिच्यासोबत मैत्रिणीही नव्हत्या. पीडित मुलगी बसमध्ये बसताच बसच्या कंडक्टरने तिच्याकडून तिकिटाचे पैसे घेतले. मात्र तिला तिकीट न देता रोज सोबत असणाऱ्या मैत्रिणींविषयी विचारपूस सुरू केली. इतर प्रवाशांना तिकीट दिल्यावर कंडक्टर तिच्याजवळ गेला आणि तिने बाजूच्या सीटवर ठेवलेली बॅग उचलून तिच्या शेजारी जाऊन बसला.

कंडक्टरचं वागणं असह्य झाल्यानं मुलीचा तिथून निघण्याचा प्रयत्न, मात्र... 

दरम्यान बस थांब्यावर थांबताच कंडक्टरने बसमधून उतरणाऱ्या प्रवाशाला आमच्यासाठी समोरील दुकानात आईस्क्रीम द्या, असं म्हटले. कंडक्टरचं विचित्रपणे वागणे पाहून मुलगी घाबरली आणि तिने आईस्क्रीमला नकार दिला. दरम्यान, त्यानंतर कंडक्टरने मुलीकडे मोबाईल क्रमांक मागितला. पण तिने नंबर देण्यास नकार देताच, तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यावर आपला नंबर डायल केला. तसेच खाली उतरल्यावर तू थोडा वेळ इथेच थांब, मी लगेच परत येतो असंही म्हणाला. कंडक्टरचं वागणं असह्य झाल्याने मुलीने तिथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने तिचा हात धरला. त्यामुळे मुलीने आरडाओरडा सुरु केला आणि बस थांबली. बस थांबताच मुलगी तत्काळ त्यातून उतरली. तसेच घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांना घडलेला प्रकार सांगितला. तसेच सिडको पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. तर स्मार्ट सिटी बस प्रशासनला याबाबत कळताच त्यांनी, संबंधित कंडक्टरला सेवेतून काढून टाकलं असल्याची माहिती मिळत आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

काय सांगता! अख्खी योजनाच गिळंकृत केली, 73 रस्त्यांचे काम न करताच 10 कोटी हडपले; दहा वर्षांनी पोलिसात गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Embed widget