एक्स्प्लोर

दोन मित्रांनी मिळून मित्राचाच काटा काढला, CCTV मध्ये हत्येचा थरार, छत्रपती संभाजीनगर हादरले

Chhatrapati Sambhajinagar Murder : ज्या दोन आरोपींनी ही हत्या केली त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Chhatrapati Sambhajinagar Murder : छत्रपती संभाजीनगर शहर दिवाळीच्या दिवशी हादरले असून रामनगर भागात एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. दोन मित्रांनी मिळून एका मित्राचा खून केल्याचं समोर आलं. विपुल चाबुकस्वार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव  आहे. तर आशिष चौतमल आणि सुबोध देहाडे असे हत्या करणाऱ्यांची नावं आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. 

आरोपी आशिष चौतमलने चाकू भोसकताना CCTV समोर आला आहे. या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस याचा अधिकचा तपास करत आहेत. 

Chhatrapati Sambhajinagar Murder : बोलता बोलता चाकूने वार

मयत झालेला विपुल चाबुकस्वार हा त्याच्या मित्रांना, म्हणजे आशिष चौतमल आणि सुबोध देहाडे यांना भेटायला गेला होता. सुबोध दहाडे हा रिक्षामध्ये बसला होता तर आशिष  आणि विपुल हे रिक्षाबाहेर एकमेकांशी बोलत होते. त्यावेळी आशिषने सुरा काढला आणि विपुलच्या छातीत तो भोकसला.

वार झाल्यानंतर काही सेकंद विपुलला काहीच समजले नाही. त्यानंतर तो खाली पडला आणि जाग्यावरच त्याचा मृत्यू झाला. ही हत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे.

या घटनेनंतर मुकुंदवाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर हत्येचा गुन्हाही नोंदवला आहे. ही हत्या नेमकी कशामुळे झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. 

Solapur Crime : सोलापुरात पतीने केली पत्नीची हत्या

सोलापुरातल्या न्यू बुधवार पेठ परिसरात चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडला आहे. यशोदा सुहास सिद्धगणेश असं या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर  सुहास तुकाराम सिद्धगणेश असं आरोपी पतीचं नाव आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुहास सिद्धगणेश आणि यशोदा सिद्धगणेश यांच्यात घरगुती वाद झाला होता. या वादातून सुहास याने पत्नी यशोदा हिला जबर मारहाण केली. इतकंच नाही तर चाकूने तिच्यावर सपासप वार केले. यामध्ये यशोदा गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाली. तेव्हा आरोपी सुहास याने घटनास्थळावरून काढता पाय घेतला. 

शेजारी असलेल्या लोकांनी घरात जाऊन पहिल्यानंतर यशोदा ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी धाव घेतली. आरोपी सुहास सिद्धगणेश याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही बातमी वाचा:

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget