एक्स्प्लोर

चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त

चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरातील प्रसिद्ध इटनकर पान सेंटरवर पोलिसांनी घातलेल्या धाडीत 5 लाख रुपये किमतीचा 104 ग्रॅम MD साठा जप्त करण्यात आला आहे.

चंद्रपूर : राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभरात भेसळ, आणि गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांच्या कारवाईला वेग आला असून कोट्यवधि रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कारवाईच्या भीतीने राज्यातील अनेक जिल्ह्यात पान पट्टीवरुन गुटखा गायब झाल्याचं दिसून आलं. तर, काही दिवसांपूर्वी एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या धकसा घेत पानटपऱ्याही बंद करण्यात आल्याचं दिसून आलं होतं. मात्र, चंद्रपूरमध्ये (chandrapur) चक्क पान सेंटरच्या दुकानातून 104 ग्रॅम एमडी ड्रग्स (MD) पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या एमडी साठ्याची बाजार भावातील किंमत 5 लाख रुपये असल्याची माहिती आहे. 

चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरातील प्रसिद्ध इटनकर पान सेंटरवर पोलिसांनी घातलेल्या धाडीत 5 लाख रुपये किमतीचा 104 ग्रॅम MD साठा जप्त करण्यात आला आहे. चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जटपुरा गेट जवळच्या इटनकर पान सेंटर वर सापळा रचून पोलिसांनी आरोपी ओम संतोष इटनकर (25) याला ताब्यात घेतले. आरोपीची तसेच त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 104 ग्रॅम एम.डी. म्हणजेच MEPHEDRONE ड्रग्ज जप्त करण्यात आले. चंद्रपूर शहरात पान शौकिनांचे आवडीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या इटनकर पान सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली. 

गडचिरोलीत एफडीएच्या पथकाची कारवाई

गडचिरोलीत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहरातील लक्ष्मी आईस फ्रुट फॅक्टरीवर टाकलेल्या धाडीत आईसक्रीममध्ये वापरले जाणारे निकृष्ट दर्जाचे 9.3 किल्लो फ्रोजन डेझर्ट जप्त केले आहे. धानोरा मार्गावर असलेल्या लक्ष्मी आईस फ्रुट फॅक्टरीत तयार होणारे हे फ्रोजन डेझर्ट वापरून तयार केलेल्या आईसक्रिम कोनवर उत्पादन दिनांक किंवा वापरण्याची अंतिम मुदत, उत्पादनाबाबतचा तपशिल असे काहीही नमूद केलेले नव्हते. विशेष म्हणजे हे फ्रोजन डेझर्ट लवकर खराब होणाऱ्या स्वरूपाचा असल्याचे पथकाला आढळून आले. अतिशय अस्वच्छ वातावरणात या पदार्थाची साठवणूक आणि एफडीएच्या नियमांची पूर्तता न करता हा कारखाना चालविल्या जात होता. यावेळी 9.3 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त करत एफडीएच्या नियमांना डावलणाऱ्या लक्ष्मी आईस फ्रुट फॅक्टरीचा परवाना अन्न प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त जी.टी.सातकर यांनी आता निलंबित केला आहे.

हेही वाचा

...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget