Buldhana News : पोलिसांची कार्यतत्परता! मुंबईवरुन अपहरण झालेल्या सहा वर्षीय बालकाची शेगाव येथे सुटका
Buldhana News : पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे मुंबईवरुन अपहरण झालेल्या एका सहा वर्षीय बालकाची सुखरूप सुटक करण्यात आली आहे. या कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
Buldhana News बुलढाणा : मुंबईतील पायधुनी पोलीस स्टेशन हद्दीत एका सहा वर्षीय बालकाचे अपहरण झाल होत. 26 मे 2024 रोजी ही घटना घडली असून मोहम्मद आसिफ असे या अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे. ही घटना उजेडात येताच मोहम्मद आसिफ याच्या कुटुंबीयांनी याबाबत पायधूनी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, अखेर मुंबईवरुन अपहरण झालेल्या या बालकाची शेगाव येथे सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे एका बालकांचे सुखरूप सुटका झाल्याने या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. मात्र यातील अपहरणकर्ते नेमकं कोण? हे अद्याप कळू शकलेले नाही. परिणामी, सध्या पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
सहा वर्षीय बालकाची शेगाव येथे सुटका
6 वर्षीय मोहम्मद आसिफ अचानक गायब झाल्याच्या घटणेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मोहम्मद आसिफच्या कुटुंबीयांनी मुंबईतील पायधुनी पोलीस स्टेशन गाठत या घटनेची माहिती पोलिसांना देत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यावेळी पोलिसांनी तात्काळ तपासाचे चक्र गतिमान करत या बालकाचा शोध सुरू केला. त्यानंतर एक बालक कोलकाताकडे जाणाऱ्या ट्रेन नं 12869 मध्ये असल्याचं पोलिसांना समजले. ही माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तात्काळ कोलकाताकडे जाणाऱ्या सर्व स्टेशन्सला याबाबत सूचना दिल्या.
पोलिसांची कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक
या सूचनेनुसार शेगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी गुप्तहेर पाठवून अपहरण झालेलं बालक एस 7 कोच मध्ये बसलेला असल्याचं माहीत दिली. त्यानंतर ही ट्रेन शेगावला येताच या बालकाला रेस्क्यू केलं आणि त्याची माहिती मुंबई पोलिसांना कळविण्यात आली. त्यावरून काल त्या बालकाला विधिवत कार्यवाही पूर्ण करून मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या सहा वर्षीय चिमुकला दूसरा तिसरा कुणी नसून मोहम्मद आसिफच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे अपहरणकर्त्याच्या तावडीतून या बालकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.परिणामी, पोलिसांच्या या कामगिरीने पुन्हा आरपीएफ विभागाचे नाव उंचावले आहे.
शेतात काम करणाऱ्या मजुराचा उष्माघातामुळे मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताने पहिला बळी गेला आहे. संग्रामपूर येथे उष्माघाताने शेतात काम करत असलेल्या मजुराचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. सचिन वामनराव पेठारे असं उष्माघाताने मृत्यू पावलेल्या 40 वर्षीय मजुराचं नाव आहे. सचिन अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असून तो शेत मजूर म्हणून काम करत होता. सचिन वामनराव पेठारे याची तामगाव पोलिसांनी उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या