एक्स्प्लोर

मृत्यूच्या दाखल्यासाठी महिला अन् अर्भकाच्या मृतदेहासह नातेवाईकांची सांगलीत भटकंती; गर्भपातप्रकरणी चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल

गर्भपातप्रकरणी चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला असून नातेवाईकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

सांगली: एका गर्भवतीचा कर्नाटकातील चिक्कोडी येथे गर्भपातावेळी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकारानंतर गर्भवतीचा मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी नातेवाईक महिला आणि अर्भकाचा मृतदेह मोटारीमध्ये घालून सांगलीत फिरत असताना सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला. 

जयसिंगपूर येथे या मयत महिलेचे गर्भलिंग निदान करण्यात आले होते. या प्रकरणात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगली पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले आहे. यामध्ये जयसिंगपूर आणि सांगलीतील प्रत्येकी एक आणि महालिंगपूरम येथील दोन डॉक्टर आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो महालिंगपूरम ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.  

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूरम येथे गर्भपात केल्यानंतर मृत्यू पावलेल्या महिलेच्या मृतदेहासह सांगलीत फिरणाऱ्या नातेवाइकांना पोलिसांनी  ताब्यात घेतल्यानंतर गर्भपात केल्यानंतर मृत झालेले अर्भकही मोटारीतच आढळून आले. सोनाली सचिन कदम  असे मृत विवाहितेचे नावे आहे. सोनालीचे दुधगाव (ता. मिरज) हे माहेर आहे. दुधगाव येथील सोनालीचा काही वर्षांपूर्वी आळते येथील तरुणाशी विवाह झाला आहे. तिचा पती सैन्यदलात कार्यरत आहे. तिला दोन मुली असून, तिसऱ्यांदा ती गर्भवती राहिल्यानंतर गर्भलिंग निदान चाचणी करण्याचे नातेवाईकांनी ठरवले. त्यांनी चौकशी करून काही दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथे एका रुग्णालयात गर्भलिंग निदान चाचणी केली. तेथील अहवाल मिळताच त्यांनी कर्नाटकातील चिक्कोडी गाठले. 

चिक्कोडीजवळील महालिंगपूर येथे एका रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला. परंतु, गर्भपातानंतर सोनालीची प्रकृती चिंताजनक बनली आणि तिचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांना धक्का बसला. त्यांनी सोनालीला अंत्यसंस्कारासाठी सासरी नेण्याची तयारी केली. परंतु, तेथील डॉक्टरांनी मृत्यूचा दाखला देण्यास नकार दिला. सोनालीच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरू नये म्हणून तातडीने अंत्यसंस्कार करणे गरजेचे होते. परंतु, मृत्यूचा दाखला मिळवायचा कसा? यासाठी तिचा मृतदेह मोटारीत घालून नातेवाईक सांगलीत आले. सांगली परिसरात कोणता डॉक्टर मृत्यूचा दाखला देईल म्हणून ते सायंकाळी चौकशी करत फिरत होते. यावेळी बसस्थानक परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले होते.  

एका मोटारीमध्ये विवाहित महिलेचा मृतदेह घेऊन मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महिलेचे नातेवाईक आणि एक वैद्यकीय अधिकारी यांना बसस्थानक परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नातेवाइकांसमवेत असणारा अधिकारी हा पदवी घेतलेला आहे की बोगस आहे याची शहनिशा करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय गर्भलिंगनिदान चाचणी जयसिंगपूरमधील ज्या रुग्णालयात करण्यात आली, तेथील एक वैद्यकीय अधिकारी आणि प्रत्यक्ष महालिंगपूरम येथे गर्भपात शस्त्रक्रियेत सहभागी असणारे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सांगली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी येथे दाखल झालेला गुन्हा वर्ग करण्यासाठी महालिंगपूरम येथे रवाना झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
Sangli : फुल दिले की फुलच मिळते, दगड दिला की दगडच मिळतो, कुणाचे पाय कापून तर आपण उंच होणार नाही : जॅकी श्रॉफ
फुल दिले की फुलच मिळते, दगड दिला की दगडच मिळतो, कुणाचे पाय कापून तर आपण उंच होणार नाही : जॅकी श्रॉफ
Sangli Satara : सांगली- साताऱ्यात तिरंगी सामना, सेनेच्या उमेदवाराचा अर्ज मागे, भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट सामना
सांगली- साताऱ्यात तिरंगी सामना, सेनेच्या उमेदवाराचा अर्ज मागे, भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट सामना
Maharashtra Rain Updates: मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
India vs Afghanistan: अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
गुलाबी आँखे जो तेरी देखी..; नागपुरात मुख्यमंत्र्यांनी गायले दोन गाणे; दुसरं गाणं धर्मेंद्रचं सुपरहीट, टाळ्या वाजवून दाद
गुलाबी आँखे जो तेरी देखी..; नागपुरात मुख्यमंत्र्यांनी गायले दोन गाणे; दुसरं गाणं धर्मेंद्रचं सुपरहीट, टाळ्या वाजवून दाद
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अभिजितचा पलटवार
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या 'अराजकतावादी' टीकेवर अभिजितचा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
Embed widget