Bhusawal News : बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त, ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकास अटक
Bhusawal News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भुसावळ पथकाने एका खासगी शेतात छापा टाकत बनावट देशी, विदेशी मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. यात 45 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
Bhusawal News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) भुसावळ पथकाने ओझरखेडा शिवारातील तलावा जवळील एका खासगी शेतात छापा टाकत बनावट देशी, विदेशी मद्यनिर्मितीचा (Duplicate Alcohol) कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत एका संशयितासह 45 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त उषा बर्मा, अधीक्षक जळगाव डॉ. व्ही. टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, यांच्या पथकाने गुरुवारी तालुक्यातील ओझरखेडा शिवारात (Ozarkheda Shivar) तलावा जवळील खासगी शेतात अवैधरीत्या बनावट देशी दारूचा कारखान्यावर कारवाई केली.
45 लाख 32 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त
बनावट मद्य बाटलीत भरण्यासाठी वापरलेली मशीन, बनावट मद्य भरलेल्या बाटल्या व बनावट लेबल सीलबंद करण्याची मशिन, देशी दारू संत्रा 90 मिलि क्षमतेच्या 55000 सिलबंद बाटल्यांचे 500 कागदी खोके, 200 लिटरच्या दहा प्लास्टिक बॅरल देशी मद्य तयार भरलेले दोन पस्टिक टाक्या, देशी दारू रफिट संत्राचे नाव छापलेले 1500 कागदी पुठ्याचे खोके, 66000 रिकाम्या सास्टिक बाटल्या (एकूण 66 खोके) संत्रा देशी मद्याच्या बाटलीचे 50000 पत्री चुचे (एकूण 10 खोके) बाटलीला बूच सिलबंद करण्याची अॅटोमॅटीक यंत्र बाटलीस पत्री बुच सिलबंद करण्याची मॅन्युअल यंत्र मोटरसह मद्याचे ब्लेंड मिक्सिंग यंत्र, तीन हायड्रोमीटर मथची तीव्रता मोजण्यासाठी मंत्र, दहा प्लॅस्टीक ट्रे, देशी मद्यास स्वाद, आणण्यासाठीचे पाच लिटर लेमन ईसेंस (लिंबूचा अर्क), मंत्रा देशी मद्याचे 70 हजार लेबल, 17 दारूचा वास येत असलेले प्लॅस्टीक रिकामे बॅरल, पाणी शुद्धीकरण यंत्र, असा सुमारे 45 लाख 32 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
रासायनिक द्रव्य वापरून बनवली दारू
या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. तसेच फरार संशयिताचा शोध सुरू आहे. या कारवाईत देशी आणि विदेशी मद्य बनावट रासायनिक द्रव्य वापरून तयार करण्यात आढळल्याने बनावटी बाटल्यांमध्ये भरून त्यावर लेबल लाउन विक्रीला पाठवत असल्याचे दिसले, दारू तयार करणारे रसायन अन्य सामग्री विविध यंत्र, असा लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुजित कपाटे यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या