एक्स्प्लोर

भरधाव रिक्षा खड्ड्यात उलटून विचित्र अपघात; दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू तर चार जखमी

कल्याण - भिवंडी मार्गावर गेल्या साडे तीन  वर्षापासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर आतापर्यत 10 जणांचा जीव गेला.

कल्याण - भिवंडी :  कल्याण भिवंडी मार्गावरच्या पिंपळघर गावाच्या हद्दीत एक भरधाव रिक्षा खड्ड्यात उलटून झालेल्या विचित्र अपघातात एका बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. कल्याणहून भिवंडीच्या दिशेनं जाणारी एक रिक्षा पिंपळघर गावातल्या हॉटेलसमोरच्या खड्ड्यात उलटली. त्यापाठोपाठ आलेली दुसरी रिक्षा त्या रिक्षावर आदळली. त्या रिक्षामागूनच येणारा एक बाईकस्वारही रिक्षावर आदळून खाली पडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. तसंच दोन रिक्षांमधली चौघंजण जखमी झाले. जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून, या अपघाताची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

कल्याण - भिवंडी मार्गावर गेल्या साडे तीन  वर्षापासून रस्ता रुंदीकरण करून सिमेंट रस्त्याचे कासव गतीने काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर आतापर्यत 10 जणांचा जीव गेला. तर 50 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.  त्यातच अर्धवट असलेल्या सिमेंट रस्त्यावरील एक खड्डा  कल्याण - भिवंडी मार्गावरील पिंपळघर गावाच्या हद्दीत एका हॉटेल समोर आहे.  या रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्यात आज पहाटेच्या सुमारास कल्याणहून भिवंडीकडे जाणारी रिक्षा प्रवाशासह पलटी झाली. त्यापाठोपाठ असलेली दुसरी रिक्षा देखील  आदळली तर त्या मागेच दुचाकीवरील चालकही रिक्षावर आदळून खड्ड्यामुळे पडला. या भीषण अपघात दुचाकीवरील अकिब शेख (28) याचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षातील चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

 मृतक अकिब शेख हा कोनगाव मधील ड्रीम कॉम्प्लेक्स समोरील एका इमारती राहणारा होता. आज पहाटे पाच वाजल्याच्या  सुमारास दुचाकीवरून रोजच्या प्रमाणे तो कामावर जाण्यासाठी कंपनीत निघाला असता त्याच्यावर काळाने घाला घातला. ,मृत अकिब शेख याला तीन मुलं पत्नीसह आईवडील भाऊ यांच्या पालनपोषणाची जबाबदारी एकट्यावर होती. मात्र त्याच्या अपघाती निधनाने शेख कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.   मृतकच्या  लहान भावाने  या अपघाताला रस्त्याचे काम करणारे  ठेकेदार व संबंधित विभागाचा अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांच्या कठोर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे रस्ता ठेकेदाराने रस्त्यात खड्डा खोदून ठेवला आहे. मात्र या खड्यात भोवती नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने  कुठली उपायजोजना व फलक नसल्याने हा विचित्र अपघात झाल्याचे मृतकच्या नातेवाईकाने सांगितले. 

मार्गावर भीषण अपघात घडल्यानंतर  जिल्ह्यातील मंत्री, विरोधी पक्ष नेते केवळ या रस्त्याची पाहणी करण्यासाठी येतात. त्याच वेळी संबंधित अधिकारी रस्ता दुरुस्तीचे काम सुरु केल्याचे दाखवतात . मात्र मंत्रीसह नेत्यांची पाठ फिरताच खंड्याचे काम अर्धवट असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे  खड्यांच्या राजकारणावरून विरोधी पक्ष असलेले  मनसे, भाजपचे लोकप्रतिनिधी व नेते महाविकास आघाडीला जबाबदार धरून रस्ता दुरुस्तीची मागणी करतात. मात्र तोपर्यत खड्यामुळे अनेक अपघात होऊन त्यांमध्ये नागरिकांचा हकनाक बळी जातो. तर काही  नागरिक  गंभीर  होत आहे. त्यामुळे  रांजणोली ते दुर्गाडी पुलापर्यत असलेल्या अर्धवट सिमेंट रस्तामुळे  होणारी अपघाताची मालिका  कधी  थांबणार ? असा सवाल नागरिकांनी  उपस्थित केला आहे. 

विशेष म्हणजे या अपघातापूर्वीच याच रस्तावरील  खड्यात दोन महिन्यापूर्वी एका नागरिकाचा अपघात झाला होता. त्याच नागरिकाने अपघाताचा केंद्र बिंदू असलेल्या खड्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करीत असतानाच एक भरधाव रिक्षा त्याच खड्यात आदळून  पलटी होऊन अपघात झाल्याचा प्रकारही कॅमेऱ्यात कैद केला. त्यांनतर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हि घटना समोर आली होती. मात्र त्यावेळी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने ठेकेदाराची बाजू घेऊन त्या ठिकाणी खड्डा नसल्याचे प्रसिद्ध पत्रक काढून तो  अपघात बनाव असल्याचे नमूद केले होते. विशेष म्हणजे या सिमेंट रस्त्याचे काम सुरु होऊन साडे तीन वर्षाच्या कालावधीत उलटून गेला. मात्र कासव छाप गती व खड्यामुळे आतापर्यत १० हुन अधिक नागरिकांचा जीव गेला. तर ५० हुन अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहे.  

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Khadse : मुलीच्या छेडछाड प्रकरणी रक्षा खडसे आक्रमक, पोलिसांची धावाधाव, एक जण ताब्यात
मुलीच्या छेडछाड प्रकरणी रक्षा खडसे आक्रमक, पोलिसांची धावाधाव, एक जण ताब्यात
Ramdas Athawale on Dhananjay Munde : वाल्मिक कराड धनजंय मुंडेंच्या जवळचा, राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री आठवलेंचं करुणा शर्मांच्या पोस्टवरही भाष्य
वाल्मिक कराड धनजंय मुंडेंच्या जवळचा, राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री आठवलेंचं करुणा शर्मांच्या पोस्टवरही भाष्य
हीच खरी श्रद्धांजली... वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन लेकाने दिला दहावीच्या इंग्रजीचा पेपर
हीच खरी श्रद्धांजली... वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन लेकाने दिला दहावीच्या इंग्रजीचा पेपर
धावत्या ट्रकचा भीषण अपघात; वाहनाचं तोंड वरती, डंपर पलटी, सुदैवाने दुर्घटना टळली
धावत्या ट्रकचा भीषण अपघात; वाहनाचं तोंड वरती, डंपर पलटी, सुदैवाने दुर्घटना टळली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : 02 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 March 2025 : ABP Majha : Maharashtra News :City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान : 02 March 2025 : ABP MajhaRaksha Khadse : एका मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्व सामान्य जनतेच्या मुली बाळींचे काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raksha Khadse : मुलीच्या छेडछाड प्रकरणी रक्षा खडसे आक्रमक, पोलिसांची धावाधाव, एक जण ताब्यात
मुलीच्या छेडछाड प्रकरणी रक्षा खडसे आक्रमक, पोलिसांची धावाधाव, एक जण ताब्यात
Ramdas Athawale on Dhananjay Munde : वाल्मिक कराड धनजंय मुंडेंच्या जवळचा, राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री आठवलेंचं करुणा शर्मांच्या पोस्टवरही भाष्य
वाल्मिक कराड धनजंय मुंडेंच्या जवळचा, राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री आठवलेंचं करुणा शर्मांच्या पोस्टवरही भाष्य
हीच खरी श्रद्धांजली... वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन लेकाने दिला दहावीच्या इंग्रजीचा पेपर
हीच खरी श्रद्धांजली... वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन लेकाने दिला दहावीच्या इंग्रजीचा पेपर
धावत्या ट्रकचा भीषण अपघात; वाहनाचं तोंड वरती, डंपर पलटी, सुदैवाने दुर्घटना टळली
धावत्या ट्रकचा भीषण अपघात; वाहनाचं तोंड वरती, डंपर पलटी, सुदैवाने दुर्घटना टळली
Virat Kohli and Rohit Sharma : कोहली आज मैदानात उतरताच 'विराट' इतिहास रचणार! कॅप्टन रोहित सुद्धा स्पेशल रेकॉर्ड करणार
कोहली आज मैदानात उतरताच 'विराट' इतिहास रचणार! कॅप्टन रोहित सुद्धा स्पेशल रेकॉर्ड करणार
Mumbai Crime: पोटात लपवून आणले तब्बल 11 कोटींचे कोकेन, ब्राझीलवरून आलेले विदेशी महिलेला 100 कॅप्सूलसह मुंबई विमानतळावर अटक
पोटात लपवून आणले तब्बल 11 कोटींचे कोकेन, ब्राझीलवरून आलेले विदेशी महिलेला 100 कॅप्सूलसह अटक
Rohini Khadse : महिला सुरक्षेसाठी गृहखातं अपयशी, पोलीस यंत्रणा कुठल्या दबावाखाली? भाचीच्या छेडछाडीवरून रोहिणी खडसे संतापल्या
महिला सुरक्षेसाठी गृहखातं अपयशी, पोलीस यंत्रणा कुठल्या दबावाखाली? भाचीच्या छेडछाडीवरून रोहिणी खडसे संतापल्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलीशान रिसॉर्टवरून तीन विमानांचे उड्डाण, हवाई दलाची पळापळ, फायटर जेट पाठवण्याची वेळ आली
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलीशान रिसॉर्टवरून तीन विमानांचे उड्डाण, हवाई दलाची पळापळ, फायटर जेट पाठवण्याची वेळ आली
Embed widget