Kalyan Crime : प्रवाशांच्या सतर्कतेमुळे 5 लुटारू गजाआड; चोरट्यांमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचाही समावेश
Kalyan Crime News : प्रवाशांच्या सतर्कतेमुळे 5 लुटारू गजाआड झाले असून धक्कादायक बाब म्हणजे, चोरट्यांमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
Kalyan Crime News : मेल एक्सप्रेसमध्ये लूटपाट करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. मेलमध्ये प्रवाशांना लुटत असताना काही प्रवाशांनी सतर्कता दाखवत 100 नंबरवर फोन केला. नियंत्रण कक्षातून कल्याण जीआरपी आणि आरपीएफला माहिती देण्यात आली. या ट्रेनमध्ये ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानानं त्वरीत या पाच जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिलं. धक्कादायक म्हणजे, पाच आरोपींमध्ये एक चौदा वर्षीय मुलाचाही समावेश आहे. न्यायालयानं चार आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
वसई येथे राहणाऱ्या जया पिसे या महिला प्रवासी त्यांच्या मुलीसोबत काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमधून प्रवास करीत होत्या. त्या सोलापूर येथून गाडीत बसल्या होत्या. 27 जानेवारी रोजी गाडी कजर्त स्थानकाजवळ आली असता बोगीत काही प्रवाशांनी चोर चोर असा आरडाओरडा सुरु केला. प्रवाशांचा आवाज ऐकून जया यांनी त्यांची बॅग जवळ ओढली आणि त्या बॅग कवटाळून बसल्या. याच दरम्यान चार ते पाच जण त्यांच्या जवळ आले. वस्तूनं भरलेली बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. जयानं त्यांना प्रतिकार केला. एकानं चाकूचा धाक दाखवीत तिच्याकडील बॅग हिसकावून घेतली. याच दरम्यान एका सतर्क नागरीकानं 100 नंबरवरुन पोलिसांना फोन केला.
नियंत्रण कक्षातून कल्याण जीआरपी आणि आरपीएफला माहिती देण्यात आली. या ट्रेनमध्ये ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानानं त्वरीत या पाच जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिलं. याबाबत कल्याण जीआरपीच्या महिला पोलीस निरिक्षक अर्चना दुसाणे यांनी हे पाचही आरोपी पुणे येथील कोंढवा या परिसरात राहणारे आहेत. तबरेज शेख, दानिश खान, अजय दबडे, निजान शेख आणि एका 14 वर्षीय मुलांचा समावेश आहे. कल्याण रेल्वे कोर्टात या चार जणांना हजर केलं असता चारही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी अशा प्रकारचा गुन्हा यापूर्वी केला आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- TET Exam Scam : टीईटी प्रकरणी अटकेतील आयएएस सुशील खोडवेकरांचं बीड कनेक्शन
- फेक अकाऊंट बनवून मुलीचे अश्लील फोटो काढले, मग केली शरीरसुखाची मागणी; वसई पोलिसांनी चतुराईनं भामट्याला पकडलं
- Pune: पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, 72 तासांत विनयभंग करणाऱ्या आरोपीला सुनावली शिक्षा; हिंजवडी पोलिसांचीही मोठी कामगिरी