(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhiwandi Crime: कोयत्याने केक कापून दहशत माजवणाऱ्या बड्डे बॉयला बेड्या, धारदार कोयताही जप्त
धारदार कोयत्याने केक कापत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी यासंबंधी कारवाई करत बड्डे बॉयला अटक केली आहे.
भिवंडी : भाई असल्याच्या थाटात हातात धारदार कोयता घेऊन दहशत माजवत सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या वाढदिवसाचा केक कोयत्याने कापून गावात दहशत निर्माण करणाऱ्या बड्डेबॉयला कोनगाव पोलीस पथकाच्या अधिकाऱ्यांनी शोध घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. नवेश सुदाम पाटील उर्फ नवा भाई (वय 31 रा. पिंपळघर) असे बेड्या ठोकलेल्या बड्डे बॉयचे नाव आहे.
आरोपी नवेश सुदाम पाटील उर्फ नवा भाई हा भिवंडी तालुक्यातील पिपंळघर गावात राहणारा आहे. या नवा भाईचा 11 जानेवारी रोजी वाढदिवस असल्याने त्याने मित्रासह पिपंळघर गावातील सर्वाजनिक ठिकाणी एक दोन फूट लांबीच्या धारदार कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.
दरम्यान 15 जानेवारी रोजी हा व्हायरल व्हिडीओ पोलिसांच्या निर्दशनास आला. त्यानंतर पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहा. पोलीस आयुक्त किशोर खैरनार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि अभिजीत पाटील, पोहवा मधुकर घोडसरे, अमोल गोरे, श्याम कोळी, पो.शि.हेमंत खडसरे यांनी या भाईचा शोध घेऊन त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले.
आरोपीकडून यावेळी दोन फूट लांबीचा धारदार कोयताही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) 135, सह शस्त्र अधीनियम कलम 4, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आज दुपारी आरोपीला नवा भाईला भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास अमोल गोरे हे करीत आहेत.
डोंबिवलीत चपलेमुळे 40 तोळे सोन्याची चोरी उघडकीस
डोंबिवलीत एका कार्यक्रमादरम्यान आरोपीने महिलेच्या पर्समधून घराची आणि तिजोरीची चावी चोरली आणि त्या चावीच्या सहाय्याने दोन तासाच्या आत घरात घुसून 40 तोळे सोन्याचे दागिने चोरले. मात्र ही चोरी लपू शकली नाही. कोणताही पुरावा नसताना अथक तपास करत डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी चोरट्या मावस बहीणला तिच्या चप्पलच्या आधारे अटक केली आणि 40 तोळे सोने हस्तगत केले आहे. प्रिया सक्सेना डोंबिवली इथल्या खोनी पलावा परिसरात राहतात. त्या नवी मुंबई इथल्या कामोठे इथे कार्यक्रमात गेल्या होता. त्यावेळी त्यांची मावस बहीण सिमरन पाटील यांनी ही चोरी केली.
ही बातमी वाचा;