Bhiwandi : कौटुंबिक वाद पेटला, रागाच्या भरात जावयाने केली चुलत सासऱ्याची दगडाने ठेचून हत्या, भिवंडीतील घटना
Bhiwandi Murder : आरोपीची पत्नी ही मयताची भाची असून मतय व्यक्ती दारू पिऊन तिला नेहमी शिवीगाळ करायचा. त्यातून जावई आणि सासऱ्यामध्ये सातत्याने वाद व्हायचे.

ठाणे : भिवंडी तालुक्यातील शेलार मीठपाडा परिसरात कौटुंबिक वादातून चुलत सासऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृताचे नाव बुआ दौल्या कोरडे (वय 35) असे असून आरोपी जावयाचे नाव रुपेश लक्षण वाघे (वय 28) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत बुआ दौल्या कोरडे हा आरोपी रुपेश वाघेचा चुलत सासरा होता. मयताची भाची ही आरोपीची पत्नी आहे . मयत बुवा कोरडे हा नेहमी दारूच्या नशेत आपल्या भाचीला शिवीगाळ करत असल्याने त्यांच्यात नेहमी भांडण होत होती.असेच भांडण सुरू असताना बुवा कोरडे हा त्याच्या भाचीला मारहाण करण्यासाठी अंगावर धावला. त्यावेळी आरोपी रुपेश वाघे आणि मयत यांच्यात जोरदार भांडण सुरू झालं.
सासऱ्याच्या डोक्यात दगड घातला
या दोघांमधील भांडण विकोपाला गेल्याने संतप्त झालेल्या रुपेशने रागाच्या भरात सासऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याला जागीच ठार केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. भिवंडी तालुका पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.
ही बातमी वाचा:























