एक्स्प्लोर

हळदीत राडा, कपडे काढून बेधुंद नाचले... जाब विचारायला गेलेल्या तरुणाना जिवानिशी संपवले; रायगडमधील धक्कादायक घटना

Raigad Murder : कार्यक्रमात मुली आहेत त्यामुळे कपडे काढून नाचू नका असं म्हटल्याचा राग आला आणि आरोपींनी एकाची हत्या केली. या प्रकरणी एक आरोपी अटकेत असून दुसरा फरार आहे. 

रायगड : हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर कपडे काढून बेधुंद नाचणाऱ्यांना अडवणे दोन भावांना महागात पडले. त्यानंतर झालेल्या भांडणात एका भावाचा जीव गेला तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बीड गावच्या इस्टूल वाडीमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी खोपोली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री खोपोली जवळील बीड गावच्या आदिवासी वाडीत लग्नसमारंभा निमित्त हळदीचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात बाळू मुकणे आणि प्रकाश पवार हे दोघे मद्यधुंद होऊन नाचत होते. त्यांनी नाचताना शर्ट काढून नाचण्याचा ठेका धरला. यावरून त्यांच्याच आदिवासी वाडीतील विलास वाघमारे यांनी त्यांना अडवले. येथे मुली महिला नाचत आहेत, त्यामुळे तुम्ही कपडे काढून नाचू नका असं सांगण्याचा प्रयत्न केला. 

Raigad Murder : राग मनात धरला अन्...

याच गोष्टीचा राग मनात धरून बाळू मुकणे आणि प्रकाश पवार यांनी विलास वाघमारे याला मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा विलास वाघमारे याचा भाऊ अनंता वाघमारे हा भांडण मिटवायला मधे पडला. तेव्हा प्रकाश पवार याने बाजूला पडलेला भात शिजवायचा भला मोठा कालता उचलला आणि विलास वाघमारे याच्या डोक्यात घातला.

या मारहाणीत विलास रक्तबंबाळ होऊन मृत्युमुखी पडला. तर भांडण मिटवायला गेलेल्या विलासच्या भावाला देखील जबर मारहाण झाल्याने तो सुद्धा गंभीर जखमी झाला आहे.

एक आरोपी फरार

सदर घटना खोपोली पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा आरोपी तेथून पसार झाले होते. पण त्या दोघांपैकी बाबू मधुकर मुकणे यास केळवली रेल्वे स्थानकात पोलिसांनी पकडले. दुसरा आरोपी प्रकाश रमेश पवार हा फरार असून त्याचा शोध खोपोली पोलीस घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai Police Salary Fraud : मोठी बातमी! चक्क मुंबई पोलीस दलातच वेतन घोटाळा; पगार काढणाऱ्यांचाच तब्बल साडेसहा कोटींवर डल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! चक्क मुंबई पोलीस दलातच वेतन घोटाळा; पगार काढणाऱ्यांचाच तब्बल साडेसहा कोटींवर डल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Nagpur Crime: नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात वर्चस्वाच्या वादातून गँगवार, भर बाजारपेठेत तडीपार गुंडांच्या दोन टोळ्यामध्ये प्राणघातक हल्ला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात वर्चस्वाच्या वादातून गँगवार, भर बाजारपेठेत तडीपार गुंडांच्या दोन टोळ्यामध्ये प्राणघातक हल्ला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
Abhijeet Dipke: आधी वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, आता अभिजीत दिपकेंविरोधात पोलिसांत तक्रार, नेमकं काय घडलं?
आधी वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, आता अभिजीत दिपकेंविरोधात पोलिसांत तक्रार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Embed widget