(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भिवंडीत किरकोळ कारणावरून एकाची दगडाने ठेचून हत्या, सहा तासात पोलीसांनी केली अटक
Bhiwandi Crime News: साईबाबा मंदिर व परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पद्मानगर परिसरातून इकलाख अहमद अली अन्सारी आणि रामनारायण सितोसी चव्हाण या दोन संशयितांना अवघ्या सहा तासात ताब्यात घेतले.
भिवंडी: भिवंडीत (Bhiwandi) सुक्या मेव्याच्या दुकानातील चोरीचा भंडाफोड (Bhiwandi Crime News) करणार असल्याच्या रागातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. दोन जणांनी ही हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होताच अवघ्या सहा तासात दोघा आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले आहे
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकलेश जयसिंग चौहान (रा.प्रेमनगर गोरेगाव, मुंबई )असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी सकाळी दहा ते साडे दहा वाजताच्या सुमारास कल्याण भिवंडी रस्त्यावरील साईबाबा मंदिराच्या पाठीमागील जंगलात त्याच्या चेहऱ्यावर तोंडावर मोठा दगड मारून हत्या केल्याचे उघडकीस आले. दोन्ही आरोपी सुक्या मेव्याच्या एका दुकानाता कामाला होते. मृत व्यक्ती देखील त्याच दुकानात कामासठी होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मृताची ओळख पटवली. त्यानंतर साईबाबा मंदिर व परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पद्मानगर परिसरातून इकलाख अहमद अली अन्सारी आणि रामनारायण सितोसी चव्हाण या दोन संशयितांना अवघ्या सहा तासात ताब्यात घेतले.
रागातून केली हत्या
ताब्याच घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपी इकलाख अन्सारी याने ड्रायफ्रुट दुकानात केलेल्या चोरीचा प्रकार हत्या झालेल्या इसमास माहित होता. घडलेला प्रकार तो लवकरच उघड करणार होता या रागातून त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली आहे. विशेष म्हणजे खून करून फरार झालेल्या गुन्हेगाराने कुठलाही पुरावा घटनस्थळी सोडला नव्हता. मात्र सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. अवघ्या सहा तासात हत्येच्या गुन्ह्याची उकल केल्याने गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुकच करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
भिवंडीत किरकोळ कारणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ
भिवंडीत किरकोळ कारणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरुन भांडणं होतात. त्याच्या रागातून खून आणि हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याबरोबरच बलात्कार, सायबर क्राईम आणि लैंगिक छळांच्या घटनेत देखील वाढ होत आहे.
हे ही वाचा :
प्रेमकहाणीचा 'सैराट' अंत! प्रेमाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीला संपवलं