Bhiwandi Crime: भांडण सोडवायला गेला अन्...; चाकूनं सपासप वार करुन तरुणाची निर्घृण हत्या
Bhiwandi Crime: भिवंडीतील गैबनगर परिसरात वफा कॉम्प्लेक्समध्ये रात्रीच्या सुमारास एकावर दोन ते तीन तरुणांनी चाकूनं सपासप वार केले. यामध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Bhiwandi Crime News: भिवंडी (Bhiwandi Crime) शहरातील गैबीनगर परिसरात एकाला तीन तरुणांचं भांडण सोडवणं भलतंच महागात पडलं आहे. या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. आपलं भांडण सोडवल्याचा राग मनात धरुन तरुणांनी भांडण सोडवणाऱ्यावरच चाकूनं सपासप वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तरुणाला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला.
भिवंडीतील गैबनगर परिसरात वफा कॉम्प्लेक्समध्ये रात्रीच्या सुमारास एकावर दोन ते तीन तरुणांनी चाकूनं सपासप वार केले. ज्यामध्ये जखमी तरुण रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. तो जीव वाचवण्यासाठी हाका मारत होता, स्थानिकांनी तरुणाचा आवाज ऐकला. जखमी अवस्थेत असलेल्या युवकाला स्थानिकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादम्यान युवकाचा मृत्यू झाला. फरहान शेख असं 28 वर्षीय मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
प्रकरण नेमकं काय?
गैबीनगर परिसरातील वफा कॉम्प्लेक्समध्ये रात्रीचा सुमारास एकावर दोन ते तीन तरुणांनी मिळून चाकूनं सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फरहान शेख 28 वर्ष असं मयताचं नाव आहे. वफा कॉम्प्लेक्सच्या परिसरात दोन ते तीन तरुण एका अल्पवयीन मुलाला प्रेम करणाच्या संशयावरून पकडून मारहाण करत होते. त्यातच त्यांचं भांडणं वाढल्याचं पाहून फरहान यानं त्याच्या काही मित्रांसोबत मिळून मारहाण करणाऱ्या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही या मुलाला मारहाण का करताय? त्यानं काही चुकीचं केलं असेल तर त्याच्या घरच्यांना बोलावून सांगा आणि इथं भांडण करू नका, असं सांगत थोडी दमदाटी करून त्यांचं भांडण सोडवलं आणि फरहाननं त्या तिघांना तिथून हाकलून दिलं.
काही वेळानंतर हे तिन्ही तरुण पुन्हा त्या परिसरात आले आणि त्यांनी फरहान शेखला वफा कॉम्प्लेक्स परिसरात एकटं गाठलं आणि त्याच्यावर चाकूनं सपासप वार केले. या हल्ल्यात फरहान शेख गंभीर जखमी झाल्यानं स्थानिकांच्या मदतीनं त्याला उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं. परंतु शरीरातून रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्यानं फरहानचा उपचारादरम्यानच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळतात शांतीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात शांतीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत एका संशयित आरोपी रियाज अन्सारी (24 वर्ष) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. शांतीनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.