Crime News : ऑटो रिक्षात प्रवासी म्हणून बसवायचे आणि लुटमार करायचे; दोघांच्या मुसक्या आवळल्या, एक कार, रिक्षा जप्त
Crime News : भिवंडी शहर आणि परिसरात रिक्षा प्रवासी म्हणून बसून सहप्रवाशांना रस्त्यात अडवून लुटमार केल्याप्रकरणी पोलिसांनी या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
![Crime News : ऑटो रिक्षात प्रवासी म्हणून बसवायचे आणि लुटमार करायचे; दोघांच्या मुसक्या आवळल्या, एक कार, रिक्षा जप्त Bhiwandi Crime news police two accused who robber co passenger in autorickshaw Bhiwandi crime news Maharshtta Crime News : ऑटो रिक्षात प्रवासी म्हणून बसवायचे आणि लुटमार करायचे; दोघांच्या मुसक्या आवळल्या, एक कार, रिक्षा जप्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/920f61e8b32169f19da36928b4c9fc481701533127140290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भिवंडी : रिक्षामध्ये प्रवासी भाडे घ्यायचे आणि मध्येच प्रवाशांची लुटमार करण्याचे प्रकार समोर आले होते. पोलिसांनी या प्रकरणात दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. भिवंडी शहर (Bhiwandi) आणि परिसरात रिक्षा प्रवासी म्हणून बसून सहप्रवाशांना रस्त्यात अडवून लुटमार केल्याप्रकरणी पोलिसांनी या दोन आरोपींना कोनगाव पोलिसांनी (Kongaon Police) अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीची एक कार, दोन रिक्षा आणि सात मोबाईल असा 7 लाख 63 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या या अटकेनंतर पाच गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले असल्याची माहिती भिवंडी पूर्व विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनी दिली.
26 नोव्हेंबर रोजी मानकोली ते राजनोली या दरम्यान रिक्षाने प्रवास करणारे सिंटू मौर्य याला रिक्षा चालकासह त्याच्या दोघा साथीदारांनी रस्त्यात थांबवले. त्यानंतर त्यांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करत लुटमार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने सुरू केला. पोलिसांच्या गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे कल्याण येथून शेखर गोवर्धन पवार आणि मनीष भोलानाथ गुप्ता या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. पोलिसी चौकशीसमोर त्यांनी गुन्हा कबूल केला. अशा प्रकारे लुटमारीच्या या व्यतिरिक्त भिवंडी तालुका, रायगड येथील दादर सागरी पोलीस ठाणे, वाशिंद ता.शहापूर आणि रबाळे पोलिस ठाणे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे लुटमार करून कार आणि रिक्षा सुद्धा चोरी केली असल्याचे समोर आले. या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या आरोपींचा एक साथीदार फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अटकेत असलेल्या दोघा आरोपींकडे अधिक तपासात अजून काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनी दिली आहे.
डंपरला रिक्षा ठोकली म्हणून मित्रालाच संपवले; कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपी अटकेत
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai Ahmedabad Highway) नायगांवजवळ (Naigaon) कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या बेवारस मृतदेहाची (dead body found) उकल सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. डंपरला रिक्षा ठोकली म्हणून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी इसमाची हत्या करुन, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या शेताच्या बांधावर दाट झुडपात टाकलेल्या अवस्थेत टाकण्यात आला होता. गुन्हे शाखा-2 च्या युनिटने मयताची ओळख पटवली. त्या गुन्ह्यातील तीन आरोपींपैकी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आरोपीची ऑटोरिक्षा मयताने डंपरला ठोकली होती. त्यात रिक्षाची काच फुटली होती. त्याचाच राग मनात धरत मयताची हत्या केल्याच निष्पन्न झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)