Bhiwandi : हॉर्न वाजवल्यावरून वाद, भिवंडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी, बाप-लेक गंभीर जखमी
Bhiwandi Crime : एकाच सोसायटीमध्ये राहत असलेल्या दोन कुटुंबातील मुलांमध्ये हॉर्न वाजवण्यावरुन वाद झाला होता. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले.

ठाणे : भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील आरिफ गार्डनच्या मागे सिटी टॉवर या पॉश हाऊसिंग सोसायटीत किरकोळ कारणावरून मोठा वाद निर्माण झाला. बाईकचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीत तनवीर फारुकी आणि अदीन फारुकी हे बाप लेक जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत.
सिटी टॉवर या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे शहबाज अन्सारी आणि दुसऱ्या मजल्यावर राहणारे तनवीर फारुकी यांच्या मुलांमध्ये एक दुसऱ्यांना पाहून हॉर्न वाजवण्यावरून आधी वाद झाला होता. मात्र आज हा वाद इतका वाढला की, दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
शहबाज अन्सारी, त्यांचा मुलगा, एक साथीदार आणि फारुकी कुटुंबात जोरदार राडा झाला. या हाणामारीत वडील तनवीर फारुकी आणि मुलगा अदीन फारुकी या बाप लेकाला जबर मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले. या बाप-लेकाला सुरुवातीला भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले.
या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोल्ड कॉफीमध्ये गुंगीचे औषध, मैत्रिणीचे दागिणे लुटले
पुण्यामध्ये एका मैत्रिणीनेच तिच्या जिवलग मैत्रिणीच्या कोल्ड कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून सोन्याचे दागिने चोरल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्या प्रकरणात तरुणीने आपल्या जिवाभावाच्या मैत्रिणीला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीला कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्याच घरातील 6 लाखांचे दागिने लुटून तरुणी फरार झाली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
याप्रकरणी पुणे पोलिसांनी 25 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पुण्यातल्या आंबेगावमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी संबंधित तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत ऐश्वर्या संजय गरड (25 वर्षे) या तरुणीला अटक केली. पुण्यातील आंबेगाव भागातून ही घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
ही बातमी वाचा:























