Bhiwandi : हॉर्न वाजवून बाजूला व्हायला सांगितलं, रागाच्या भरात दोघा भावांवर केला चाकूने वार
Bhiwandi Crime : हॉर्न वाजवल्याच्या रागातून दोघा तरूणांनी दुसऱ्या दोघा भावांना मारहाण केली, नंतर चाकूने वारही केल्याची घटना भिवंडीत घडली.
![Bhiwandi : हॉर्न वाजवून बाजूला व्हायला सांगितलं, रागाच्या भरात दोघा भावांवर केला चाकूने वार Bhiwandi Crime accused stabbed both brothers with knife due to bike horn marathi news Bhiwandi : हॉर्न वाजवून बाजूला व्हायला सांगितलं, रागाच्या भरात दोघा भावांवर केला चाकूने वार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/07/b0fcb4319ba8bcd5f38bcbc97065bd151725700747115923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : भिवंडी शहरातील गुलजार नगर परिसरात घरी जात असताना एका व्यक्तीने रस्त्यावर असलेल्या लोकांना हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितल्यानंतर किरकोळ वाद झाला. नंतर त्याचे पर्यवसन चाकू हल्ल्यात झाले. यामध्ये आरोपीने दोन सख्ख्या भावांवर चाकूने वार करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. अमीर शेख आणि अकील शेख असे या हल्ल्यात जखमी झालेल्या भावांची नाव आहेत. घटनाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
भिवंडी शहरातील गुलजार नगर परिसरात राहणारा अमीर शेख आपल्या पत्नीसह शाळा क्रमांक 70 च्या मागे गल्लीतून घरी जात होता. समोर काही महिला आणि तरुण जात असल्यामुळे हॉर्न वाजून त्यांना बाजूला होण्यासाठी सांगितले. या गोष्टीचा तेथील तरुणांना राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. याचा जाब विचारायला गेलेल्या अमीर शेख आणि तेथे असलेल्या तरुणांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि पाहता पाहता या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाली .
हा मारहाणीचा प्रकार समोर येताच अमीर याचा भाऊ अकील शेख भांडण सोडवण्यासाठी पोहोचला. परंतु तेथील सकिब अंसारी आणि हुसेन चायनीजवाला यांन त्या दोघांना जबर मारहाण करत धारदार हत्यारने त्यांच्यावर वार केले. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत असलेल्या दोघा भावांना स्थानिकांनी भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. परंतु त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कळवा येथे रेफर करण्यात आले. या संदर्भात शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांतीनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सकिब अंसारी आणि हुसेन चायनीजवाला या दोघांना ताब्यात घेतलं आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)