एक्स्प्लोर

Bhandara News : प्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून, थरार सीसीटीव्हीत कैद 

Bhandara News Update : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील देव्हाडी मार्गावर प्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने वार करुन एका तरुणाचा खून करण्यात आला आहे.

Bhandara News Update : प्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने वार करुन एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील देव्हाडी मार्गावरील हॉटेल प्रसाद समोर घडली आहे. खुनाचा हा थरार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सचिन गजानन मस्के ( वय, 34 रा. शिवाजी नगर तुमसर ) असे मृत तरूणाचे नाव आहे. या घटनेत तीन आरोपींचा समावेश असून दोघांना पोलिकांनी अटक केली आहे. परंतु, मुख्य  आरोपी अद्याप फरार आहे. कुलदीप मनोहर लोखंडे (वय 27) आणि चेतन दिलीप मदारकर (वय 28 दोघेही रा. शिवाजी नगर तुमसर ) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे असून रंजीत सहदेव  गभने (वय 32 वर्ष रा. शिवाजी नगर, तुमसर ) हा अद्याप फरार आहे. 

भंडारारा जिल्ह्यातील तुमसर शहरामधील देव्हाडी मार्गावरील हॉटेल प्रसादमध्ये सचिनसह तीन ते चार जण जेवन करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी गेले होते. जेवन आटोपून हे सर्व हॉटेलच्या बाहेर आले. त्यावेळी जून्या प्रेम प्रकरणातून तेथे वाद झाला. या वादानंतर सचिन आपल्या दोन मित्रांसोबत दुचाकीवरून निघाला असता त्याची गाडी थांबत आरोपी रंजीत गभने याने सचिनच्या  पाठीवर आणि पोटावर धारधार हत्याराने सपासप वार केले. त्यात सचिन जागीच ठार झाला. सचिन मृत्युमुखी पडल्याची खातरजमा होताच सर्व आरोपींनी तेथून पळ काढला. 

घटना सीसीटीव्हीत कैद
दरम्यान, या खुनाच्या घटनेचा थरार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जे दोघे जण सचिन याच्या गाडीवर वसून आले होते. ते त्याचा खून झाल्यानंतर मुख्य आरोपी रंजीत याच्या गाडीवर बसून घटनास्थळावरून पळून गेले. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजवरून तुमसर पोलिसांनी दोन आरोपींला अटक केली असून मुख्य आरोपी फरार आहे. प्रेम प्रकरणामुळे सचिनला संपविण्याचा कट आरोपींनी आधीपासूनच आखल्याची माहिती पुढे येत आहे. फरार झालेल्या आरोपीचा शोध सुरू असून तुमसर पोलीस  पुढील तपास करीत आहेत. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Antilia Bomb Scare Case : अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Sangli Crime : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
Beed Crime: उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला, अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget