एक्स्प्लोर

काँग्रेस उमेदवारासाठी पैशांचं वाटप, 5 जणांना अटक; पोलिसांकडून 20 लाखांची रोकड जप्त

लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होत आहे. प्रचाराच्या तोफा आज थंडावल्याने आता रात्रीस खेळ चाले, अशा माध्यमातून मतदारांना अमिष दाखवण्यात येत आहे.

बेळगाव : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जागोजागी चेकपोस्ट असल्याचं दिसून येतं. निवडणूक काळात होणाऱ्या गुन्हेगारी (Crime News) व अवैध घटनांना आळा घालण्याच काम होत आहे. मात्र, तरीही कुठे ना कुठे पोलिसांच्या छाप्यात रोकड, मद्यसाठा जप्त केला जात आहे. त्यातच, तिसऱ्या टप्प्यातील मतदान केवळ एक दिवसांवर येऊन ठेपल्याने पैसेवाटपाच्याही घटना समोर येत आहेत. बेळगाव (Belgaum) लोकसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचे कार्यकर्ते गोकाक येथे घरोघरी पैसे वाटत असताना आढळून आले होते. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.  

लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होत आहे. प्रचाराच्या तोफा आज थंडावल्याने आता रात्रीस खेळ चाले, अशा माध्यमातून मतदारांना अमिष दाखवण्यात येत आहे. त्यातच, बेळगावचे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर ह्यांच्या कार्यकर्त्यांना भाजप समर्थकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात येत होतं. पोलिसांनी त्यांच्याकडून वीस लाख रुपये जप्त केले आहेत.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गोकाक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी पैसे वाटप करण्यास आलेल्या 5 जणांना भाजप कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. लोकसभा मतदारसंघातील मतदारांना वाटण्यासाठी कार्यकर्त्याच्या एका घरात लाखो रुपये ठेवले होते. या पैसेवाटप मोहिमेची माहिती भाजपा कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी पैसे वाटणाऱ्याना रंगेहात पकडले.घरोघरी प्रत्येकी एक हजार रुपये वाटणाऱ्या पाच जणांना पैशांसह रंगेहात पकडण्यात आले. विशेष म्हणजे भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मतदारांना वाटण्यासाठी आणलेली 20 लाख रुपयांची रक्कम भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. एका कारमध्ये काँग्रेस उमेदवाराची पत्रके आणि पैसेही पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी गोकाक पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. 

दरम्यान, भाजपने बेळगावमधून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांना उमेदवारी दिली आहे. मतदारसंघातील लिंगायत समाजाचे प्राबल्य पाहून काँग्रेसने महिला व बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल रवींद्र हेब्बाळकर यांना तिकिट दिले आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांत प्रथमच भाजपपुढे तगडे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा

बीडमध्ये चंदनतस्करी... निवडणूक धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त; नगरसेवकच होता 'पुष्पा'

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget