एक्स्प्लोर

Parli Crime : परळीत चोरांचा उच्छाद, गाईंनाही सोडेनात! गुंगीचे औषध खाऊ घालून गाई पळवण्याचा प्रयत्न फसला

Beed Crime : गाईंना गुंगीचे औषध खाऊ त्यांना झायलो, अर्टिगा गाडीतून पळवण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. 

बीड : जिल्ह्यातील परळी शहरात संतापजनक प्रकार समोर आला असून स्नेह नगर भागात मध्यरात्रीनंतर गाईंना वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून गुंगीचे औषध खाऊ घालून त्यांना पळून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा प्रकार परिसरातील लोकांच्या लक्षात येताच आरडाओरड झाल्याने हे चोरटे पळून गेले.विशेष म्हणजे चोरट्यांचा झायलो आणि अर्टिगा गाडीतून गाई नेण्याचा प्रयत्न असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. चोरीच्या प्रयत्नांची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

गाई बेशुद्ध पडल्या

ज्या गाईंनी हे पदार्थ खाल्ले होते त्या गाईंना हालचाल देखील करता येत नव्हती. यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, चोरटे गाडीतून उतरले आणि त्यांनी गाईंना ब्रेड, शेंगदाणे खाऊ घातले. त्यानंतर काहीच वेळात त्या गाई बेशुद्ध पडल्या. 

एकूण सहा गाई त्या ठिकाणी बेशुद्ध पडल्या. त्यावेळी बेशुद्धावस्थेतील त्या गाईंना पळवण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. नेमकं त्यावेळी काहीजण त्या ठिकाणी आले. चोरट्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर चोरट्यांनी पलायन केलं. 

अशीच प्रकरणं या आधीही झाल्याचं नागरिकांनी सांगितलं. या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांनी घ्यावी आणि अशा पद्धतीने गाई चोरी करणाऱ्यांचा शोध लावावा अशी मागणी आता गोप्रेमी नागरिक करत आहेत. सहा गाईंपैकी पाच गायींची तब्येत उपचारानंतर सुधारली असून आता एक गाय गंभीर आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
Digital Arrest : आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget