Beed Crime : विवस्त्र महिला धावतानाचा व्हिडिओ व्हायरल; भाजप आमदार पत्नीविरोधात गुन्हा दाखल
Beed Crime : जमिनीच्या वादातून एक महिला विवस्त्र अवस्थेत धावत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Beed Crime : विवस्त्र महिला धावतानाचा व्हिडिओ व्हायरल; भाजप आमदार पत्नीविरोधात गुन्हा दाखल Beed Crime Video of naked woman running goes viral case filed against BJP MLA Suresh Dhas wife beed Maharashtra Beed Crime : विवस्त्र महिला धावतानाचा व्हिडिओ व्हायरल; भाजप आमदार पत्नीविरोधात गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/21/ae1e4c3a7002fdd254b19471f8d756bf1697909132377290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : विवस्त्र महिला रस्त्यावरून धावतानाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला होता. बीडमधील (Beed) या व्हिडीओने राज्यात खळबळ उडाली. या व्हिडीओ प्रकरणी भाजप आमदाराच्या (BJP MLA) पत्नीसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जमिनीच्या वादातून एक महिला विवस्त्र अवस्थेत धावत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आष्टी तालुक्यातील वाळुंज या ठिकाणी हा प्रकार घडला. याप्रकरणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह दोघ जणांच्या विरोधामध्ये विनयभंगाचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जी महिला विवस्त्र होऊन धावत आहे त्या पीडित महिलेचे कुटुंब मागच्या काही दिवसापासून ही शेतजमीन वाहत आहे. मात्र, इतर दोघांनी सुद्धा त्या जागेवर आपली मालकी असल्याचा दावा केला आहे. दोन दिवसांपूर्वी याच वादातून या ठिकाणी भांडण झाले आणि याच भांडणानंतर ही महिला एका पुरुषाच्या मागे विवस्त्र होऊन धावताना पाहायला मिळत आहे.
संबंधित जागेचा वाद सोडवण्यासाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस त्या ठिकाणी गेल्या होत्या. प्राजक्ता धस त्या ठिकाणी गेल्यानंतरही तो वाद वाढत गेला. या पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघा जणांच्या विरोधामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये इतर दोघे आणि प्राजक्ता धस यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बायको नांदायला येईना, नवऱ्याची आत्महत्या, 8 जणांवर गुन्हा, खळबळजनक घटनेने जिल्हा हादरला
पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड (Beed Maharashtra) जिल्ह्यात घडली. याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आष्टीतील (Aashti) अंभोरा पोलिसांनी (Ambhora Police) याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. पत्नीला सासरी घेऊन जाण्यासाठी पती गेला होता. मात्र त्नीच्या नातेवाईकांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या शिवीगाळमुळे अपमानित झाल्याने, पतीने टोकाचं पाऊल उचललं. पतीने थेट विषारी द्रव्य घेऊन आयुष्य संपवलं.
नेमकं काय घडलं?
आष्टी तालुक्यातील पती अण्णाराव हे पत्नीला आणण्यासाठी भोजेवाडी या गावी गेले होते. सासुरवाडीला गेल्यावर सासरच्या लोकांनी अण्णाराव यांना शिवीगाळ केली. या शिवीगाळमुळे अण्णाराव यांना अपमानित झाल्यासारखं वाटलं. पत्नीच्या नातेवाईकांनी केलेली शिवीगाळ अण्णाराव यांना चांगलीच जिव्हारी लागली. अण्णाराव हे आपल्या घरी आले. त्यानंतर त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अण्णाराव यांनी विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)