बीड हादरले! पत्नी माहेरी जाताच वाद टोकाला गेला, पोटच्या पोराने वयोवृद्ध आईला संपवले
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात पत्नी माहेरी गेल्यानंतर आई सोबत भांडण झाले .याच भांडणातून मुलाने आईला निर्घृणपणे संपवल्याचा प्रकार समोर आला

Beed Crime: बीड जिल्ह्यात हत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये .गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेचा केंद्रस्थानी असणारे बीड पुन्हा एकदा खुनाच्या घटनेमुळे हादरले आहे .अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा गावात पोटच्या मुलाने वयोवृद्ध आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . चोत्राबाई भानुदास सोन्नर असे मृत महिलेचे नाव आहे . घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतला आहे .या घटनेचा पुढील तपास सुरू आहे . (Beed Crime)
नक्की घडले काय?
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात पत्नी माहेरी गेल्यानंतर आई सोबत भांडण झाले .याच भांडणातून मुलाने आईला निर्घृणपणे संपवल्याचा प्रकार समोर आला .या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे .अंबाजोगाई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मुलगा आणि त्याच्या वृद्ध आईमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. आरोपीची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. त्यानंतर घरी एकटे राहणाऱ्या आईसोबत वारंवार वाद होत होते. अशाच वादातून संतप्त होऊन मुलाने आईवर हल्ला केला आणि तिचा खून केला.
या घटनेमुळे येल्डा गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आईचा खून केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:
अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेतलाच नाही; सत्कार सोहळ्यात माजी आमदार राजेश पाटलांना हुंदका






















