एक्स्प्लोर

अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेतलाच नाही; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं 2024 चं राज'कारण'

उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड  विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी, येथील राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील यांच्याकडून अजित पवारांचा नागरी सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) आज कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर असून चंदगड येथील नागरी सत्कार सोहळ्यात अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिला. अजित पवारांनी फेटा बांधण्यास नकार दिल्याने अनेकांनी आश्चर्य वाटले. पण, चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा, राजेश पाटील यांचा पराभव झाल्यामुळे अजित पवारांनी फेटा बांधण्याचे टाळले. विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील यांच्या मतदारसंघासाठी आपण भरभरुन निधी दिला. 1600 कोटी रुपयांची विकासकामे मतदारसंघात झाली. मात्र, येथील नागरिकांना राजेश पाटील यांचा पराभव केला. जिल्ह्यात महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आले, पण राजेश पाटील (Rajesh Patil) पराभूत झाले. गड आला पण सिंह गेला, अशी भावना अजित पवारांनी यावेळी बोलून दाखवली. तसेच, सत्कार सोहळ्यात फेटा बांधणे टाळले.  

उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड  विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी, येथील राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील यांच्याकडून अजित पवारांचा नागरी सत्कार करण्यात आला. पण, यावेळी अजित पवारां कोल्हापुरी फेटा बांधून घेतला नाही. विधानसभा निवडणुकीत चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव झाला, त्याचा संदर्भ देताना माजी आमदार राजेश पाटील यांना अश्रू अनावर झाले. बोलताना राजेश पाटील यांचा हुंदका दाटून आला, सर्व काही सुरळीत असताना माशी कुठं शिंकली हे मला माहीत नाही. पण, ही जनता कायम आपल्यासोबत राहिलं. अजित दादांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेलं पाहिल्याशिवाय आपण वाढदिवस साजरा करणार नाही. माझे डोळे मिटण्याच्या आधी मला अजित दादांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेलं पाहायचं आहे, असं देखील राजेश पाटील म्हणाले. 

गड आला पण सिंह गेला

मी आज कोल्हापुरी फेटा बांधून घेतला नाही, कारण माझा उजवा हात असलेला राजेश याठिकाणी पराभूत झाला आहे. राजेशला पुन्हा आमदार करा, तुम्ही म्हणाल तितके फेटे बांधून घेईन, असे स्पष्टीकरणच अजित पवारांनी आपल्या भाषणातून दिले. चंदडगमध्ये राजेश पाटील यांचा पराभव झाला याची खंत वाटते. या मतदार संघात आम्ही 1600 कोटी रुपयांचा निधी दिला, मी कायम सांगतो, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. दर महिन्याला लाडकी बहीण योजनेला 45 हजार कोटी जातात. 2024 साली राजेश पाटील यांचा पराभव झाला याची खंत वाटते. नरसिंग गुरुनाथ यांना एकदा 11 मतांनी निवडून दिलं, काय अजब लोकं आहेत राव, असेही अजित पवार म्हणाले. जिल्ह्यात महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आले पण आमचे राजेश पाटील हे निवडून आले नाहीत. म्हणजे गड आला पण आमचा सिंह गेला, याचं मला खूप दुःख आहे, अशा शब्दात अजित पवारांनी राजेश पाटील यांच्या पराभवाची खंत बोलून दाखवली. 

हसन मुश्रीफांनीही केला दादांचा उल्लेख

मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आपल्या भाषणात अजित पवार यांनी फेटा बांधून का घेतला नाही याचा उल्लेख केला.चंदगड विधानसभा मतदारसंघात दादांनी प्रचंड निधी दिला होता. त्यामुळे राजेश पाटील निवडून येतील असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. राजेश पाटील यांनी आता लोकांच्या वैयक्तिक कामासाठी वेळ घालवला पाहिजे, तुम्हाला निधी मिळणार आहे असे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. तसेच, आता कोणत्याही नेत्याने घरात बसून सदस्य नोंदणी करून घ्यायची नाही, असेही मंत्री महोदयांनी सांगितलं. 

 

दरम्यान, अजित पवार यांनी भाषण करतेवेळी कार्यकर्त्यांना डी झोनमध्ये बसण्यास परवानगी दिली. पोलिसांना सूचना देऊन उन्हात उभारलेल्या कार्यकर्त्यांना सावलीत बसवलं. जनता आहे म्हणून आम्ही आहोत, नाहीतर आम्हाला कोण विचारतं, असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांबद्दलची आपली भावना बोलून दाखवली. 

हेही वाचा

दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का? अजित पवारांचं उत्तर; उपमुख्यमंत्र्यांकडून 2 वाक्यातच भूमिका स्पष्ट

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Embed widget