एक्स्प्लोर

Beed Crime News: लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर

Beed Crime News: पती-पत्नीत वाद झाला काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली असे नमूद आहे.

बीड/अंबाजोगाई: लग्न होऊन अवघे १२ दिवस झाले असतानाच गणेश दत्तू कोळी या तलाठी तरुणाने राहत्या (Beed Crime News) घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात घडली होती. आता या प्रकरणी गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी यांच्या फिर्यादीवरून पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल (Beed Crime News) करण्यात आला आहे. पत्नीचे बाहेरील अनैतिक संबंध आणि मानसिक त्रासामुळेच गणेशने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे.आता या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.(Beed Crime News)

या प्रकरणी आईने दिलेल्या फिर्यादीत लग्नानंतर कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचे वागणे संशयास्पद वाटू लागले. ती कोणाशी तरी लपून फोनवर बोलत असे. त्यानंतर घरात सत्यनारायणाची पूजा झाली, मात्र पत्नीचे वागणे बदलले. तिने हे लग्न आपल्या मर्जीविरुद्ध झाल्याचे सांगत गणेश सोबत राहण्यास नकार दिला आणि ती अंबाजोगाईला निघून गेली. गणेश २४ मे रोजी पत्नीला भेटण्यासाठी मोरेवाडी, अंबाजोगाई येथे आला. २५ मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून रडत सांगितले की, पत्नीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने डायरीत तसे लिहून ठेवले आहे, जे त्याने वाचले आहे. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली असे नमूद आहे.(Beed Crime News)

गणेश हा २०२१ मध्ये राज्य राखीव पोलीस बलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्यानंतर त्याने तलाठी परीक्षेचा अभ्यास करून २०२४ मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली होती. १३ मे रोजी गणेश दत्तू कोळी याचा विवाह बीड येथील तरुणीशी मोठ्या उत्साहात पार पडला.गणेशची पत्नी ही अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

Beed Crime News:  नेमकं काय घडलं?

अवघ्या १२ दिवसांपूर्वी विवाह झालेल्या एका तरुण तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोरेवाडी परिसरात उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. गणेश दत्तू कोळी असे मृत तरुणाचे नाव असून ते चंद्रपूर महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत होते.(Beed Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोळीची पत्नी अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे. घटनेच्या वेळी पत्नी ड्युटीवर गेली असताना गणेश यांनी खोलीतील लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. नवविवाहानंतर इतक्या कमी कालावधीत घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, गणेश कोळी यांनी टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!

Embed widget