एक्स्प्लोर

Beed Crime : चनई ग्रामपंचायत सदस्याचा भर रस्त्यात खून, 17 जणांवर अॅट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा, सहा अटकेत

Beed Crime : अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथील ग्रामपंचायत सदस्याच्या हत्येप्रकरणी 17 जणांवर अॅट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा जणांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरु आहे.

Beed Crime : बीड (Beed) जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथील ग्रामपंचायत सदस्याच्या हत्येप्रकरणी 17 जणांवर अॅट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सहा जणांना अटक करण्यात आली असून इतर 11 जणांचा शोध सुरु आहे. ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ घनगाव यांचा दसऱ्याच्या दिवशीच भर रस्त्यात निर्घृण खून करण्यात आला होता. 

चनई ग्रामपंचायतचे सदस्य असलेले गोरखनाथ घनगाव हे बुधवारी (5 ऑक्टोबर) सकाळी रमेश कदम यांच्या स्वस्त धान्य दुकानात धान्य आणण्यासाठी गेले होते. यावेळी कदम तसंच त्यांची मुले सुरज आणि धीरज यांनी गोरखनाथ घनगाव यांना धक्काबुखी करत रेशन दुकानाच्या बाहेर काढलं. तसंच त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. ग्रामपंचायत सदस्य असल्याने रेशनची तुम्हाला काय गरज असं म्हणून त्यांना रेशन देण्यास नकार दिला होता.

मारहाणीत गोरखनाथ गंभीर जखमी, उपचारादरम्यान मृत्यू 

रेशन दुकानातून परत आलेले गोरखनाथ दुपारी आपल्या शेतात गेले असता इटकर नावाच्या एका व्यक्तीने रमेश कदम यांच्याशी झालेल्या भांडणावरुन गोरखनाथ यांना शिवीगाळ केली आणि धमक्या दिल्या. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी गोरखनाथ घनगाव हे गावात परत आल्यानंतर रमेश कदम याने काही गुंडांना सोबत घेऊन त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि यामध्येच मनोज इटकर याने धारदार शस्त्राने गोरखनाथ यांच्यावर वार केले, त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. नवनाथ इटकर आणि धीरज कदम यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गोरखनाथ यांना अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कुटुंबियांच्या आंदोलनानंतर पोलिसांकडून 17 जणांवर गुन्हा

गोरखनाथ घनगाव यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी आणि नातलगांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. त्यानंतर पोलिसांनी आता गोरखनाथ यांच्या हत्येप्रकरणी 17 जणांवर ॲट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर यामध्ये सहा जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाईAnjali Damania on Beed | गरज नसलेले बंदुकीचे परवाने रद्द करा, पोलीस खात्याचा दुरूपयोग- दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Embed widget