(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed Crime : परळीत मामानेच केला धारदार शस्त्राने चार वर्षाच्या भाच्याचा खून
परळी तालुक्यातील नागपूर येथे राहणाऱ्या सनिक लक्ष्मण चिमणकर यांनी आपला चार वर्षाचा भाचा कार्तिक विकास करंजकर याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.
बीड : रागवलेल्या भावाची समजूत काढण्यासाठी गेलेल्या बहिणीचा तिच्या भावासोबत वाद झाला आणि हाच वाद एवढा विकोपाला गेला की रागाच्या भरात भावानेच चार वर्षाच्या भाच्याचा खून केल्याची धक्कादायक घटना बीड (Beed Crime) जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने परिसरात उडाली आहे.
परळी तालुक्यातील नागपूर येथे राहणाऱ्या सनिक लक्ष्मण चिमणकर यांनी आपला चार वर्षाचा भाचा कार्तिक विकास करंजकर याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. सनिक चिमणकर हा आपला विवाह करण्यासाठी कुटुंबीयांसोबत नेहमीच वाद घालत होता. यातूनच तो घरच्या लोकांना मारहाण देखील करायचा म्हणून त्याची समजूत काढण्यासाठी केज तालुक्यातल्या लाडेगाव येथे असलेली त्याची बहीण सुरेखा ही आपल्या चार वर्षाचा मुलगा कार्तिकसह माहेरी आली होती.
माहेरी आलेल्या बहिणीने सनिकला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातील सर्वजण त्याला समजावून सांगत असताना बहीण आणि भाऊ सनिकमध्ये वाद झाला आणि हाच राग मनात धरून सनिक याने पहाटेच्या वेळी भाचा कार्तिक याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली. जखमी झालेला कार्तिक बचावासाठी आरडाओरडा करू लागला. कार्तिकचा आरडाओरडा ऐकून आई सुरेखा धावत आली. सानिकच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कार्तिकला तिने उपचारासाठी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. वयाने कमी असलेल्या कार्तिक वर धारदार शास्त्राने खोलवर वार झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या सर्व प्रकरणानंतर परळी पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आणि आरोपी सनिक चिमणकर याला अटक केली. कौटुंबिक वादातून झालेल्या हा किरकोळ वाद एवढा विकोपाला गेला की त्यामध्ये चार वर्षाच्या कार्तिकला आपला जीव गमावा लागला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :