Mumbai Crime News : बांगलादेशी अडल्ड स्टारचं भारतात अवैधरीत्या वास्तव्य, उल्हासनगरमधून बांगलादेशी कुटुंबाला अटक
Bangladeshi Illegal Immigrants : एका बांगलादेशी अडल्ड स्टारचं अख्खं कुटुंबच बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्यास असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
Bangladeshi Illegal Immigrants : भारतात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उल्हासनगरमधून पोलिसांनी एका बांगलादेशी अभिनेत्राला अटक केली आहे. ही अभिनेत्री अडल्डस्टार असल्याचंही सांगितलं जात आहे. या अडल्ड स्टारचं अख्खं कुटुंबच बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्यास असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. उल्हासनगरमध्ये ही तरुणी रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे या मराठी नावाने राहात होती.
बांगलादेशी अडल्ड स्टारचं भारतात अवैधरित्या वास्तव्य
उल्हासनगरमधील हिल लाईन पोलिसांनी बांगलादेशी तरुणीला बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य केल्याच्या आरोपांखाली अटक केली आहे. बांगलादेशी अडल्ड स्टार तरुणीसह तिच्या कुटुंबालाही पोलिसांनी अटक केली आहे. बांगलादेशी अडल्ड स्टार रिया, तिची आई, तिचा भाऊ आणि तिची बहीण अशा सगळ्यांनीच खोट्या कागदपत्रांच्या मदतीने भारतीय नागरिकत्व मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
उल्हासनगरमधून बांगलादेशी कुटुंबाला अटक
बांग्लादेशी घुसखोरांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बांगलादेशी घुसखोरांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्रातील अनेक शहरं ही ज्वालामुखींच्या तोंडवर उभी आहेत, अशी चिंता आता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मागील तीन वर्षात सुमारे 700 हून अधिक बांग्लादेशींना पोलिसांनी पकडलं आहे. त्यानंतरही हे प्रमाण वाढताना दिसत आहे.
मुंबई आणि गुजरातमध्ये बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण जास्त
पोलिस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, भारतात आजही असंख्य बांग्लादेशी वास्तव्यास आहेत. कोलकत्ता मार्गे हे बांगलादेशी अवघ्या 30 हजारात सीमा ओलांडून भारतात येतात. बांगलादेशी घुसखोर मुंबई किंवा गुजरातमध्ये राहण्याला पसंती दाखवतात. मुंबईत भिवंडी, मालवणी, मालाड, मानखुर्द या भागात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी वास्तव्यास असल्याचं समोर आलं आहे.
- चालू वर्षात म्हणजेच जानेवारी ते जून 2024 मध्ये 177 बांग्लादेशी नागरिकांना पकडण्यात यश, त्यातील 81 जणांना स्वगृही बांग्लादेशला पाठवण्यात पोलिसांना यश आले आहे.
- चालू वर्षात जून 2024 पर्यंत 177 बांग्लादेशी नागरिकांन पकडण्यात यश आलं असून आतापर्यंत फक्त 81 बांग्लादेशींना स्वगृही पाठवले आहे.
- 2023 मध्ये 368 बांग्लादेशींना पकडण्यात यश आलं असून यातील 68 बांग्लादेशींना स्वगृही पाठवलं आहे.
- 2022 मध्ये 148 बांग्लादेशींना पकडण्यात यश आलं असून यातील फक्त 21 जणांना स्वगृही पाठवण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :