एक्स्प्लोर

नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम

बदलापूर कुळगाव बदलापूर नगरपरिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रस्ते कामाचे बिल आणि सुरक्षा ठेव मोकळी करण्यासाठी 6 टक्के लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठाणे : राज्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भ्रष्टाचाविरोधी मोहिम जोरदारपणे हाती घेतल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यात भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकत एसीबीने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलीय. आता, कुळगाव बदलापूर (Badlapur bribe) नगर परिषदेतील अकाउंटेंट  विकास चव्हाण यांच्या विरोधात एसीबीने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. कामांची बिल आणि सिक्युरिटी डिपॉझिट परत करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने सहा टक्के लाच मागितली होती. त्यानंतर, तक्रारदाराच्या तक्रारीवरुन ठाणे लाचलुचपत विभागाने धडक देत आरोपीवरुद्ध बदलापूर पूर्व पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. 

बदलापूर कुळगाव बदलापूर नगरपरिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रस्ते कामाचे बिल आणि सुरक्षा ठेव मोकळी करण्यासाठी 6 टक्के लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला असून, नगरपरिषदेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीपर्यंत नगर परिषदेतील कंत्राटदारांकडे बिले देण्यासाठी टक्केवारीची मागणी केली जात असल्याचे आरोप होत होते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला कार्यमुक्तही करण्यात आले होते. या प्रकरणातील तक्रारदाराची कंपनी रस्ते बांधणीचे काम करते. त्यांना कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या एकूण 77 विकासकामांचे कंत्राट मिळाले असून त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. या कामांपैकी दोन देयकांची 17 लाख 44 हजार रुपये आणि पूर्वी केलेल्या कामाची सुरक्षा अनामत रक्कम 4 लाख 99 हजार रुपये, अशी एकूण 22 लाख 43 हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यात आली होती. ही रक्कम जमा करून दिल्याच्या मोबदल्यात 6 टक्के प्रमाणे 1 लाख 34 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागण लेखाधिकारी विकास चव्हाण यांनी केली अशी तक्रार संबंधित तक्रारदारांची होती.

तक्रारदाराने या लाचेच्या मागणीविरोधात 9 डिसेंबर 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी 10 डिसेंबर 2025 रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणी दरम्यान, विकास चव्हाण यांनी कामाचा मोबदला म्हणून 6 टक्के रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. या पडताळणीच्या आधारे गुरूवार, 30 एप्रिल रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये विकास चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

मुख्याधिकाऱ्यांनीही दिला दुजोरा

पोलीस निरीक्षक प्रमोद आहिरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या गुन्ह्याबाबत विकास चव्हाण यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा दूरध्वनी बंद होता. याबाबत कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांना संपर्क केला असता, त्यांनी असा गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त मान्य केले. लेखाधिकारी विकास चव्हाण यांना महिनाभरापूर्वीच कार्यमुक्त केले होते. तसेच या प्रकरणाची माहिती त्यांच्या संबंधित विभागालाही कळवली जाईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा

कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
स्वाभिमानीच्या जिल्ह्याध्यक्षाने थेट बँक मॅनेजरच्याच कानशिलात लगावली, बुलढाण्यातील सेंट्रल बँकेत धक्कादायक प्रकार, पोलिसात तक्रार दाखल
स्वाभिमानीच्या जिल्ह्याध्यक्षाने थेट बँक मॅनेजरच्याच कानशिलात लगावली, बुलढाण्यातील सेंट्रल बँकेत धक्कादायक प्रकार, पोलिसात तक्रार दाखल
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त  
सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त  
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget