एक्स्प्लोर

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवी अपडेट, गुन्हे शाखेकडून 26 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

Baba Siddique Murder Case : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणात लवकरच गुन्हे शाखेचे पोलीस आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणात लवकरच गुन्हे शाखेचे पोलीस आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी एकूण 26 आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली असून या आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. यात शुभम लोणकर, झिशान अख्तर आणि लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई अशी तीन आरोपींना फरार घोषित करण्यात येणार आहे. या हत्येमागील कारणाबाबत मुंबई गुन्हे शाखेला अद्याप काहीही ठोस सापडले नसल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. मात्र मुंबई क्राईम ब्रँचने एसआरए वादाच्या ही हत्या झाली आहे का? याचा तपास केला असता पोलिसांना एसआरए प्रकल्पामुळे ही हत्या झाली असल्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नसल्याचेही बोलले जात आहे. 

हत्येमागील मूळ कारण अद्याप अस्पष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हत्या प्रकरणात सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांच्यातील जवळीकता यातूनच ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणातील अटक आरोपी हे दिलेल्या टास्कनुसार काम करत होते. त्यामुळे हत्येमागील मूळ कारणाबाबत त्यांनाही फारशी माहिती नसल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकर आणि झीशान अख्तर यांना अटक होईपर्यंत या हत्येमागचे खरे कारण स्पष्ट होणार नसल्याचे मत तपास अधिकार्‍यांचे आहे.

पोलीस तपासात धक्कादायक खुलासा 

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्याच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे.

दरम्यान, यापूर्वी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आकाशदीप नावाच्या आरोपीला पंजाबमधील फाजिल्का येथून अटक करण्यात आली होती. अटक आरोपी आकाशदीप गिलने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. मुंबई क्राइम ब्रँचच्या चौकशीदरम्यान गिलने बाबा सिद्दीकी हत्याकांडातील गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याचे उघड केले. बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिराच्या दानपेटीतून पैशांची चोरी! अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
अयोध्या राम मंदिराच्या दानपेटीतून पैशांची चोरी! अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
Pune Crime News: झटपट श्रीमंत होण्याचे आमिष नडले! बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे पुण्यातील आयटी व्यावसायिकाला लुटले; दोन आठवड्यांत तब्बल 4 कोटी गायब
झटपट श्रीमंत होण्याचे आमिष नडले! बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे पुण्यातील आयटी व्यावसायिकाला लुटले; दोन आठवड्यांत तब्बल 4 कोटी गायब
Beed Crime: गुंगीचे औषध घालून बळजबरीनं आधी मंचुरियन खाऊ घातले, नंतर लॉजवर दोघांकडून अत्याचार, ब्लॅकमेल करत तीन लाख रुपयांसह साडेनऊ तोळं सोनंही उकळले, अंबाजोगाई हादरलं!
गुंगीचे औषध घालून बळजबरीनं आधी मंचुरियन खाऊ घातले, नंतर लॉजवर दोघांकडून अत्याचार, ब्लॅकमेल करत तीन लाख रुपयांसह साडेनऊ तोळं सोनंही उकळले, अंबाजोगाई हादरलं!

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
Iran Nuclear Bomb: इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांचा राज्यसभा उमेदवारीचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'
छगन भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
SBI : स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
Mumbai Best Bus Accident: बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; टॅक्सी आडव्या पडल्या, दुचाकी चक्काचूर, दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
Embed widget