Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्यांच्या लिस्टमध्ये सर्वात पहिलं होतं, सलमान खानचं नाव, पण...; चौकशीतून धक्कादायक खुलासा
Baba Siddique Murder Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं (Salman Khan) नावही बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्यांच्या हिटलिस्टमध्ये होतं, असा धक्कादायक खुलासा पोलीस चौकशीत करण्यात आला आहे.
Salman Khan, Bishnoi Gang : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्रांचकडून (Mumbai Crime Branch) दररोज नवनवीन तथ्य समोर येत आहेत, अशी माहिती मुंबई क्राईम ब्रांचच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. झिशान सिद्दिकीसोबत (Zeeshan Siddique) बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं (Salman Khan) नावही बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्यांच्या हिटलिस्टमध्ये होतं, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेनं 26 आरोपींना अटक केली आहे. या सर्व आरोपींविरुद्ध मकोकाची गंभीर कलमंही जोडण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या चौकशीदरम्यान, शूटरला सलमान खानला देखील लक्ष्य करायचं होतं, परंतु, सलमान खानला धमकी आल्यापासूनच तो पोलिसांच्या आणि सुरक्षारक्षकांच्या गराड्यात होता. त्याच्या भोवती असलेल्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे बिश्नोई गँगचा शूटर त्याच्या नियोजनात यशस्वी होऊ शकला नाही.
पोलीस तपासात धक्कादायक खुलासा
तपासात असंही समोर आलं आहे की, आरोपी सलमान खानवर हल्ला करण्यात अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्याचं संपूर्ण लक्ष बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांच्यावर केंद्रीत केलं. 12 ऑक्टोबर रोजी ते बाबा सिद्दिकीची हत्या करण्यात यशस्वी झाले, पण, हत्येच्या काही मिनिटांपूर्वीच झिशान सिद्दिकी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडले आणि फक्त बाबा सिद्दिकी शूटरच्या कचाट्यात सापडले.
एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तपासादरम्यान आम्हाला मिळालेल्या माहितीवरून असं दिसून येतं की, आरोपींनी एकदा सलमान खानच्या घराची रेकी केली होती आणि त्यानंतर त्यांनी पाहिलं की, सलमान खानच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत. सलमान खान त्याच्या कारमध्ये बसूनच त्याच्या बिल्डिंगमधून बाहेर पडतो, त्यामुळे त्याच्या जवळ जाणं अशक्य होतं, यानंतर आरोपींनी त्यांचं लक्ष सलमान खानवरून हटवलं आणि बाबा सिद्दिकींवर केंद्रीत केलं.
लॉरेन्स गँगच्या धमक्यांमुळे अभिनेता सलमान खान आधीच Y+ श्रेणीच्या सुरक्षेत होता, बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर त्याच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांची संख्या आणखी वाढवण्यात आली आहे. सध्या त्याच्या सुरक्षेसाठी दोन एस्कॉर्ट वाहनांसह सुमारे 50-60 पोलीस अधिकारी तैनात आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :