एक्स्प्लोर

धक्कादायक! भर रस्त्यावर उभं राहून तरुणानं केलं भयंकर कृत्य; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ व्हायरल

Aurangabad Crime: औरंगाबादमध्ये भर रस्त्यात एका तरुणाने स्वत:वरच वार करुन घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे.

Aurangabad Crime News: औरंगाबादमध्ये ( Aurangabad)  एका तरुणाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडीओ (Video) समोर आला आहे. भर रस्त्यावर उभा राहून स्वतःचा गळा चिरून घेतानाचा या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. औरंगाबाद-अहमदनगर रोडवरील ए.एस.क्लब जवळील ही घटना असून, तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सोमवारी दुपारनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील सोशल मीडियावर एक 'लाईव्ह सुसाईड'चा व्हिडीओ (Live Suicide Video) व्हायरल होत आहे . ज्यात एक 35 वर्षीय तरुण आपल्या हातात असलेल्या ब्लेडने स्वतःच्या अंगावर वार करतोय. विशेष म्हणजे पोटावर आणि गळ्यावर तो हातातल्या ब्लेडने एका मागून एक वार करताना पाहायला मिळतोय. भर रस्त्यावर तो अशाप्रकारचं कृत्य करत असल्याने वाहनधारकांचे लक्ष देखील त्याच्याकडे गेले. मात्र त्याला थांबवण्यासाठी कुणीच मधी पडलं नाही. काही वेळात रक्तस्त्राव झाल्याने हा तरुण जमिनीवर कोसळला.

घटनास्थळी पोलिसांची धाव...

औरंगाबाद अहमदनगर रोडवरील एएस क्लबजवळ मुख्य रस्त्यावर एक तरुण स्वतःवर ब्लेडने वार करत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला त्वरित औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राम बदालिया असे तरुणाचे नाव असून, हा युवक हिंदी भाषिक असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. परंतु त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अद्याप समजू शकले नाही.

अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ....

स्वतःच्या अंगावर जखमा करून घेतानाचा या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंगात पिवळा टी शर्ट घातलेला हा तरुण गळ्यापासून तर पोटापर्यंत स्वतःच्या हातानेच ब्लेडने वार करत होता. त्याच्या अंगावर एवढ्या जखमा झाल्या होत्या की, संपूर्ण टी-शर्ट रक्ताने लाल भडक झाला होता. रक्ताच्या धारा थेट पायापर्यंत पोहोचल्याने पॅन्ट देखील लाल झाली होती. अंगावर शहारे आणणारा त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र या तरुणाने एवढ्या टोकाचा पाऊल का उचललं याची माहिती खुद्द आता या तरुणांकडूनच मिळू शकते. त्यामुळे शुद्धीवर आल्यावर पोलीस त्याचा जवाब नोंदवण्याची शक्यता आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् संतापाच्या भरात पोटच्या गोळ्याचा काढला काटा, समुद्रात नेलं अन्...; घटनेनं मुंबईत खळबळ
पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् संतापाच्या भरात पोटच्या गोळ्याचा काढला काटा, समुद्रात नेलं अन्...; घटनेनं मुंबईत खळबळ
Ahilyanagar Crime News : संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Embed widget