एक्स्प्लोर

Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...

Ashok Kharat News: अशोक खरात एका आऊट डोअर व्हिजिटसाठी घ्यायचा पाच लाख रुपये फी, पुण्याच्या भक्ताने 90 लाखांची कारही देऊन टाकली. एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

Ashok Kharat: नाशिकमधील नराधम भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत दिवसेंदिवस नवनवी माहिती समोर येताना दिसत आहे. अशोक खरात याच्या भक्तगणांमध्ये अनेक बडे सरकारी अधिकारी, उद्योगपती आणि राजकारण्यांचा समावेश होता. गरीब आणि सर्वसामान्य घरातील लोकांकडून फारसे पैसे मिळण्याची शक्यता नसल्याने अशोक खरात (Ashok Kharat) त्यांच्याकडे फारसे लक्षही द्यायचा नाही. अशोक खरात याचे बहुतांश भक्त हे श्रीमंत असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. हे भक्त अशोक घरात याला घसघशीत दक्षिणाही द्यायचे. यापैकी काही भक्त हे अशोक खरात याला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरी, फार्म हाऊस अशा ठिकाणी घेऊन जाण्यासाठी इच्छूक असत. अशा एका आऊट डोअर व्हिजिटसाठी अशोक खरात हा तब्बल 5 लाख रुपये घेत असल्याचे वृत्त 'दैनिक लोकमत'ने दिले आहे. (Nashik Crime news)

अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी अशोक खरात याच्या नाशिकमधील बंगल्यावर आणि कार्यालयात बड्या भक्तांची गर्दी होत असे. याठिकाणी खरातचा दरबार भरत असे. त्यामुळे या परिसरात अनेक महागड्या कार दिसायच्या. तांत्रिक विधींच्यादृष्टीने अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याने हे श्रीमंत भक्त अशोक खरात याने याचदिवशी आपल्यासोबत यावे, यासाठी आग्रही असत. या सगळ्यांपैकी जो जास्त पैसे देईल, त्याच्यासोबत अशोक खरात जात असे, अशी माहिती एसआयटीच्या तपासातून समोर आल्याचे समजते.

पुण्यातील अशाच एका करोडपती भक्ताला अशोक खरात याने पूजा करण्यासाठी गाडी हवी, असे सांगून 90 लाखांची महागडी कार खरेदी करायला लावली होती. ही कार अशोक खरात याने स्वत:च्या नावावर करुन घेतली होती. 

Nashik Crime news: अशोक खरातची पोलीस कोठडी 1 एप्रिलला संपणार

अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला आतापर्यंत तीनवेळा न्यायालयात सादर करण्यात आले आहे. त्याची पोलीस कोठडी आतापर्यंत दोनवेळा वाढवण्यात आली आहे. उद्या 1 एप्रिलला अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आहे. त्याला पुन्हा न्यायालयात सादर केले जाईल. त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्त्वाखालील एसआयटी पथकाकडून अशोक खरात याची कसून चौकशी करण्यात आली आहे. तसेच एसआयटीच्या पथकाने लैंगिक अत्याचार झालेल्या पिडीत महिलांना घेऊन खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात सीन रिक्रिएशन केले होते. यावेळी त्याच्या कार्यालयाची कसून तपासणी करण्यात आली. तेव्हा पोलिसांनी काही औषधं आणि रत्नं सापडल्याची माहिती काल समोर आली होती.

आणखी वाचा

अशोक खरात बड्या सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा, विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget