एक्स्प्लोर

Ashok Kharat: नराधम अशोक खरातचं संतापजनक कृत्य, नवऱ्याला केबिनबाहेर बसवून गर्भवती महिलेवर अत्याचार, आणखी एक गुन्हा दाखल

Ashok Kharat: महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये आधीच अटकेत असलेल्या खरातविरुद्ध आता आणखी एक नवीन गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Ashok Kharat: नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) याच्याविरोधातील प्रकरण अधिकच गंभीर बनत चालले आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये आधीच अटकेत असलेल्या खरातविरुद्ध आता आणखी एक नवीन गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाणे (Sarkarwada Police Station) येथे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पीडित महिला गर्भवती असताना ‘पूजा विधी’च्या नावाखाली खरातने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर या प्रकाराची माहिती बाहेर दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे. महिलेसोबत येणाऱ्या तिच्या पतीला बाहेर बसवून, आतमध्ये ‘उपचार’ किंवा ‘विधी’च्या नावाखाली अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Ashok Kharat: नकली साप आणि वाघाची कातडी आणून अघोरी कृत्य

तपासादरम्यान आणखी काही भयावह बाबीही उघड झाल्या आहेत. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी नकली साप आणि वाघाचे कातडे वापरून अघोरी विधी केल्याचा आरोपही खरातवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात लैंगिक अत्याचारासोबतच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच BNS कलम 64(1), 74 आणि 351(2) अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या नव्या गुन्ह्यामुळे विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीला आणखी वेग आला असून, आधीच समोर आलेल्या 100 हून अधिक कथित व्हिडिओंनंतर आता पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणा सर्व बाजूंनी पुरावे गोळा करत असून, खरातच्या तथाकथित ‘अध्यात्मिक’ जाळ्याचा मोठा भांडाफोड होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Ashok Kharat:  खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी तीन महिला पुढे आल्या

दरम्यान, अशोक खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांनी पुढे येत तक्रार नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या तिन्ही महिलांना विश्वासात घेऊन त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय पद्धतीने चौकशी करण्यात येत आहे. विशेष तपास पथक या महिलांचे जबाब अत्यंत संवेदनशीलतेने नोंदवत असून, नव्या साक्षींमुळे खरातविरोधातील पुरावे अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Ashok Kharat:  खरात प्रकरणातील एसआयटीचे चौकशी स्थळ बदलले

गेल्या तीन दिवसांपासून गुन्हे शाखा कार्यालय आणि पोलीस क्लब येथे अशोक खरातची चौकशी सुरु होती. मात्र, आज रविवारी एसआयटीने चौकशीचे ठिकाण अचानक बदलले असून खरातला अज्ञातस्थळी हलवले आहे. या कारवाईदरम्यान प्रचंड गोपनीयता आणि खबरदारी घेतल्याची माहिती समोर येत आहे. या चौकशीला एसआयटी प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते स्वतः उपस्थित राहून तपासावर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. कालच खरातची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली होती, तर आजही त्याची सखोल चौकशी सुरू आहे. तसेच खरातच्या ‘ईशान्येश्वर’ मंदिरातील पुजारी आणि काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी आणण्यात आले आहे. या चौकशीमधून मंदिर आणि खरातच्या फार्महाऊसवर नेमक्या कोणत्या प्रकारच्या हालचाली सुरू होत्या, याचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat Viral Video: अशोक खरातच्या विकृतीचा नवा Video समोर, आईसमोरच मुलीला टी-शर्ट वर करायला सांगितला, नंतर केबल टेस्टर वापरून...

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Sangli: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget