एक्स्प्लोर

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात, पुजारी आणि एका कर्मचाऱ्याला चौकशीसाठी पुन्हा समोरासमोर बसवलं; नेमकं काय काय समोर आलं?

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातच्या काळे कारणामेसह आर्थिक व्यवहारांची देखील विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. 

Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू असून खरातच्या ईशान्येश्वर मंदिराचे पुजारी आणि एक कर्मचारी याची पुन्हा चौकशी केली. अशोक खरातच्या काळे कारणामेसह आर्थिक व्यवहारांची देखील विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. 

मंदिरात होणाऱ्या पूजा, पूजेसाठी घेतलेल्या देणग्या तसेच इतर दान स्वरूपात येणारा पैसा कोणत्या खात्यात जात होता. कॅश स्वरूपात किती पैसे दान येते तर, आर्थिक व्यवहार कोणाच्या नावावर होत होते अशी सर्व माहिती पुजारी कडून घेऊन इतर मंदिरात विशेष महापूजा सुरु होत्या. त्यासाठी कोण पूजाविधी करत, कोणत्या पूजा केल्या जात होत्या. त्यासाठी काही आर्थिक व्यवहार होत होते का? अशी सर्व माहिती पुजारी, कर्मचारी यांच्याकडून तपास पथकाने घेतली. तसेच काही पुरावे आणि साक्षीदार तयार करत जबाब नोंदवण्यात आले असून अशोक खरात आणि पुजारी तसेच एक कर्मचारी यांची पुन्हा एसआयटीकडून समक्ष चौकशी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. (Ashok Kharat Case)

युएईपर्यंत पोहोचलेल्या हवाला रॅकेटचीही चौकशी ईडीकडून केली जाणार- (Ashok Kharat ED Inquiry)

अशोक खरात यांच्या बँक व्यवहारांसह मोठ्या प्रमाणातील मालमत्ता आणि युएईपर्यंत पोहोचलेल्या हवाला रॅकेटचीही चौकशी ईडीकडून केली जाणार आहे. तपासात 130 हून अधिक बँक खात्यांमधील व्यवहारांची छाननी केली जात असून, त्यात ‘समता नागरी पतसंस्था’सह विविध सहकारी संस्थांचा समावेश आहे. सुमारे 63 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम या खात्यांमधून फिरवल्याचा संशय आहे. अनेक खात्यांमध्ये खरात यांचे नाव ‘नॉमिनी’ म्हणून असून, ती खाती त्यांच्या मोबाईल नंबरवर चालवली जात होती, असा प्राथमिक अंदाज आहे. तसेच पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 100 कोटींच्या मालमत्तांवरही ED चे लक्ष आहे. या मालमत्ता त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश पोफळे यांच्या नावावर असल्याचे सांगितले जाते. 2024 मध्ये पोफळे यांनी 18 रो-हाऊस आणि सुमारे 49 गुंठे जमीन खरेदी केल्याची नोंद आहे. अधिकृत किमत 19.56 कोटी रुपये असली तरी बाजारमूल्य 100 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे काळा पैसा, कर चुकवेगिरी आणि बेनामी गुंतवणुकीचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच नाशिक, सिन्नर आणि शिर्डी येथे 52 हून अधिक जमिनींची चौकशी ईडी करणार असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.

तेजस्वी सातपुते आज पत्रकार परिषद घेणार- (Ashok Kharat Case)

अशोक खरात प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून खरातने महिलांचे लैंगिक शोषण,आर्थिक गैर व्यवहार तसेच इतर काळे कारणामे  केल्याप्रकरणी एसआयटीकडून  तपास सुरू आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात दाखल गुन्हासंदर्भात सुरू असलेल्या तपासाची एसआयटीकडून महत्वाची माहिती देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासानंतर स्वतः एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते पहिल्यांदाच प्रत्यक्ष साधणार माध्यमांशी संवाद आहेत. 

संबंधित बातमी:

Anjali Damania On Ashok Kharat Case: रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, अंजली दमानियांनी कॉल रेकॉर्ड्स काढले, मंत्र्यांचीही नावं घेतली!

महत्त्वाच्या बातम्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget