एक्स्प्लोर

Ashok Kharat Case Nashik Crime News: भोंदूची पत्नी फरार, मुलगा ताब्यात; काल रात्री अशोक खरातच्या घराबाहेर नाट्यमय घडामोडी, आता लेकासमोर बापाची चौकशी, नेमकं काय काय घडलं?

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक खरातवर दाखल असणाऱ्या अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात याधी तीनवेळा त्याला पोलीस कोठडी सूनवण्यात आली आहे.

Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार आहे. त्याच्याविरोधात नवनवीन तक्रारी दाखल होत आहेत. अशोक खरातने केलेलं लैंगिक शोषण, अनेकांना घातलेला आर्थिक गंडा आणि इतर अनेक कारनाम्यांची जंत्री वाढतच चालली आहे. त्यामुळे खरातची कोठडी एसआयटी कोर्टाकडे वाढवून मागणार आहेत. (Ashok Kharat Case)

अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक खरातवर दाखल असणाऱ्या अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात याधी तीनवेळा त्याला पोलीस कोठडी सूनवण्यात आली आहे. अशोक खरातला आज कोर्टात हजर करण्याआधी रात्री उशिरापर्यंत नाट्यमय घडामोडी घडत होत्या. शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एसआयटीचे पथक खरातच्या घरी जाण्याअधीच खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाली. तर खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

मुलासमोर अशोक खरातची चौकशी करणार- (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्यानं त्याच्या समोर मुलाची चौकशी होणार आहे. अशोक खरात सहकार्य करत नाही, स्पष्ट माहिती देत नसल्यानं तपास पुढे सरकत नसल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरातकडून अधिकाधिक माहिती गोळा करून त्याच्या पत्नीला अटक करण्याचं एसआयटीचे लक्ष आहे. सुरुवातीला लैंगिक शोषणाचा गुन्ह्याचा तपास करण्यावर एसआयटीचा भर असून त्यानंतर इतर गुन्ह्याचा तपास केला जाणार आहे. आज अशोक खरातला कोर्टात हजर केल्यानंतर सरकारी पक्ष काय बाजू मांडतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

अशोक खरातचा सीए, मंदिराचा पुजारी आणि एका सराफ मालकाचीही चौकशी- (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार असताना एसआयटीकडून अशोक खरातचा सीए, ईशान्यश्वर मंदिराचा पुजारी आणि एक सराफ व्यवसायिकाची कसून चौकशी करण्यात आली. अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार असून काल एसआयटीने खराच प्रकरणे सबळ पुरावे गोळा करण्यासाठी तिला दोन मोठ्या कारवाया केल्या. व्यापाराची फसवणूक प्रकरणी अशोक कराडची चौकशी तर, ईशान्यश्वर मंदिरात कोणते कारणामे सुरू होते. याची चौकशी आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारा सीए याची देखील एसआयटीकडून चौकशी करण्यात आली. अशोक खरातला आज कोर्टात दाखल केल्यानंतर एसआयटीकडून महत्त्वाचे पुरावे कोर्टासमोर सादर करत पुन्हा पोलीस कोठडी मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. 

संबंधित बातमी:

Ashok Kharat : मोठी बातमी! भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गायब

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget