एक्स्प्लोर

Big Breaking : 'शाहरुखकडे 25 कोटींची मागणी, वानखेडेंना 8 कोटी!' क्रूझ केसमधील पंच प्रभाकर साईल यांचा गौप्यस्फोट

Drugs Case Update: सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. एक खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल यांनी केला आहे.  

Drugs Case Update: सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. आर्यन खान ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल यांनी दिली आहे.  एबीपी माझाशी बोलताना एनसीबी रेडचे पंच क्रमांक 1 असलेले प्रभाकर साईल यांनी सांगितलं की, त्यांची या प्रकरणात पंच म्हणून सही घेतली होती. मात्र तो कागद ब्लँक होता. रेडच्या दिवशी किरण गोसावीने त्यांना येलो गेटला बोलवलं आणि त्यानंतर साईल यांनी गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं.  सईल यांनी सांगितलं की, माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या परिचिताकडे सोलापूरला 10-12 दिवस राहिलो.  

साईल यांनी गोसावीचे चोरून लपून व्हिडीओ शूट केले. त्यात गोसावी आर्यन खानला मोबाईलवर बोलायला लावलं असं दिसतंय.  याच 25 कोटींची मागणी केली. त्यावर 18 कोटींवर डील झाली आणि मी ऐकलं त्यानुसार वानखेडेंना 8 कोटी द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं, असा दावा देखील साईल यांनी केला आहे. 

कोण आहे प्रभाकर साईल 
क्रुझ कारवाई प्रकरणातील प्रथम क्रमांकाचे नाव असणारे पंच
हा पंच  किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड  
किरण गोसावींकडेच याची राहण्याची व खाण्याची व्यवस्था 

क्रुझ कारवाईच्या दिवशी काय झालं
प्रभाकर साईल यांनी सांगितलं की, क्रुझ कारवाई झाली त्यादिशी मी किरण गोसावींसोबतच होतो. किरण गोसावी एनसीबी ऑफिसला गेले...मी खालीच थांबलो होतो.  गोसावी बरोबर सव्वा बाराला खाली आले. आम्ही तिथून जवळच जाऊ फ्रॅकी, थम्स अप घेतलं. तिथू ग्रीन गेटला गेलो. ग्रीन गेटच्या आत गेलो तिथे समीर वानखेडे,त्यांचे सहकारी बसले होते तिथे त्यांना फ्रॅकी आणि पाणी-थम्सअप वगैरे दिले. नंतर क्रुझच्या बाहेर गेलो. तिथुन मला एकाठिकाणी थांबवून बाहेर जाऊ नको असे सांगितलं.  मला काही फोटो दाखवण्यात आले होते व ते फोटो असलेले लोक आले की त्यांना ओळखायला सांगितलं होतं. फोटोतल्या व्यक्ती आल्या की मला गोसावींना रिपोर्ट करायचं होतं, असं साईल यांनी सांगितलं.

साईलनं सांगितलं की, क्रुझवर घेऊन जायला एक बस होती. बसमधून कोण  जातं त्याला ओळखायला सांगितलं होतं. 2700 नंबरच्या  बसमध्ये फोटोमधली एक व्यक्ती बसली त्यालाच मी ओळखलं. बाकीच्यांना ओळखलं नाही कारण सर्वांनीच मास्क घातले होते. 4.29 वाजता मला फोटो दिले त्यातील 13 व्यक्ती आल्या आहेत असा मेसेज दिला. आर्यन खान माझ्यासमोरच आले होते. त्यांना घ्यायला बस नाही तर क्रुझवरची व्हिआयपी गाडी आली होती.  कारवाई करतांना मी क्रुझवर नव्हतो. क्रुझच्या गेटवर होतो. क्रुझवर मी साडेअकरा दरम्यान पोहोचलो होतो.

मला ब्लॅंक पेपरवर सह्या करायला लावल्या
मी आणि किरण गोसावी आणि मनिष भानुशाली हे बाहेरचे लोक होतो.  क्रुझवर कारवाई दरम्यान किरण गोसावी, वानखेडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.11.30 दरम्यान मी बोर्डींग होते तिथे गेलो. तेव्हा मी आर्यन खानला केबिनमध्ये बसलेलं बघितलं.   एनसीबी कार्यालयात जेव्हा पावणेबाराला सगळ्यांना आणलं. तेव्हा पंचाचा साक्षीदार म्हणून मला सही करायला एनसीबी कार्यालयात वर बोलावलं. तिथे साळेकर नावाच्या एनसीबी अधिकाऱ्यानं मला ब्लॅंक पेपरवर सह्या करायला लावल्या. मी याबाबत किरण गोसावींकडे ब्लॅंक पेपरवर कश्या सह्या करु असं विचारलं तेव्हा समीर वानखेडे तिथे आले आणि म्हणाले काय नाही होत तू कर सह्या. मी सह्या केल्या. 9 ते 10 ब्लॅंक पेपरवर मला सह्या करायला लावल्या. माझं आधारकार्ड मी त्यांना व्हॉटसअप केलं. पंच म्हणून जेव्हा माझी सही घेतली तेव्हा पेपर पूर्ण ब्लॅंक होते, असं साईल यांनी सांगितलं.

सईल यांनी पुढं सांगितलं की, NCBच्या अधिकाऱ्यांकडे ऑफिसमध्ये -सॅनिटरी पॅड, प्लास्टिकच्या बरण्या असं सामान होते. एनसीबी कार्यालयात तेव्हा एका चेअरवर आर्यन खान आणि शेजारी किरण गोसावी बसले होते तेव्हा मी त्यांचा गपचुप व्हिडीओ शुट केला. व्हिडीओमध्ये किरण गोसावी एका फोनवर आर्यनचं कुणाशी ती बोलणं करुन देत होता. 

किरण गोसावींचा काय रोल

साईल यांनी सांगितलं की, किरण गोसावींकडे मी 22 जूलै पासून बॉडीगार्ड म्हणून काम करतो. ठाण्याला काम करायचो. गोसावी कारवाईच्या अगोदर  अहमदाबावरुन निघाले होते. किरण गोसावी पावणेतीनला एनसीबी ऑफीसच्या खाली आले. तेव्हा सॅम नावाचा व्यक्ती गोसावींना भेटायला आला होता..रात्रीतुन दोन वेळा त्यांची मिटींग झाली.  साडेचारला एनसीबीहून लोअर परळला निघालो. तेव्हा त्यांनी सॅमला फोन केला.  फोनवर म्हणाले, 'उनको बोल 25 करोड में डील करने के लिये.  18 करोड में फायनल कर. 8 करोड वानखेडे को देना हैं' सॅम हा शाहरुख खान आणि गोसावी मधला को ऑर्डीनेटर होता, असा दावाही साईल यांनी केला आहे.

साईल यांनी सांगितलं की, मला लोअर परळला दोन गाड्या दिसल्या होत्या. त्यापैकी एका गाडीत पुजा ददलानी होती. किरण गोसावी, सॅम आणि पुजा मध्ये 15-20 मिनीट बोलणं झालं. 3 तारखेच्या साडेपाचला सकाळी पुव्हा गोसावींना सॅमचा फोन आला. पुजा तेव्हा फोन उचलत नाही असं सॅम सांगत होता. किरण गोसावींनी व्हॉटसअप कॉल साडेचार दरम्यान केला होता आणि कारवाईनंतरच्या डीलबाबत सांगितलं.  पाचपर्यंत मला पुन्हा किरण गोसावींचा फोन आला. अर्जंट  ताडदेव रोडला इंडीयाना हॉटेल बाहेरुन पैसे कलेक्ट करायचे आहेत.  तिथे 5201 नंबरची गाडी होती. तिथे दोन कागदी पिशव्यांमधून 50 लाख रुपये घेऊन गाडीत बसून मी सांगितल्याप्रमाणे वाशीला आलो. वाशीला येऊन मी पैसे  सरांना दिले. सर आणि त्यांची मिसेस बॅग घेऊन निघण्याच्या तयारीत होते. संध्याकाळी 5 ला वाशी इनॉर्बीट मॉलला बोलावून किरण गोसावींनी मला पुन्हा  पैशाची पिशवी दिली. तिथुन ओलाने मी चर्चगेटला गेलो. ती पिशवी सॅमला दिली. त्या पिशवीत 38 लाख रुपयेच होते.  सॅमने याबाबत किरण गोसावीला फोनवरुन विचारलं.गोसावीने दोन दिवसांत व्यवस्था करतो सांगितलं,असं प्रभाकर यांनी सांगितलं. 

प्रभाकर साईल इतके दिवस शांत का राहिला?

साईलनं सांगितलं की, मी शांत राहिलो कारण माझा फॅमिली प्रॉब्लेम आहे. मला राहतं घर नाही. मी गोसावींकडे 24 तास ड्युटी करायचो. तिथेच राहायचो, खायचो. मला काही दिवसांनंतर नंतर मिसेसचा फोन आला की त्यांना फोन येतायेत पोलिसांचे. मला भीती वाटली की माझ्या फॅमिलीकडे पोलिस का येतायेत. स्वाभिमान रिपब्लिक पार्टीच्या संस्थापकांकडे मी आलो आणि आता त्यांच्या छत्रछायेखाली आहोत. मला कारवाईनंतर दोन दिवस फोन स्विच ऑफ करायला लावला. माझा पगार त्यांच्याकडे बाकी आहे. इतक्या दिवसांत माझा कुणाशीच संपर्क नाही.  मला भीती वाटतेय की मी पंच म्हणून उभा राहिलोय.  मला समीर वानखेडेंकडून धोका आहे, असंही प्रभाकर साईलनं म्हटलं आहे.

कोण आहे किरण गोसावी?
पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या माहितीनुसार एबीपी माझाने किरण गोसावीचा शोध सुरू केला. यावेळी अत्यंत धक्कादायक माहिती एबीपी माझाच्या हाती लागली. पोलीस दलात नोकरी करून निवृत्त झालेले प्रकाश गोसावी यांचा मुलगा हा किरण गोसावी आहे. सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत. गेली अनेक वर्षे ते ठाण्यातील ढोकळी इथं एका सोसायटीमध्ये राहतात. मात्र किरण आणि आमचा गेल्या 12 वर्षांपासून काहीही संबंध नाही असे त्याच्या कुटुंबीयांनी एबीपी माझाला सांगितले. किरणचे बी कॉम पर्यंत शिक्षण झालेले आहे, मात्र तो व्यवसनाधीन असल्याची माहिती देखील एबीपी माझाला मिळाली आहे. किरण विवाहित असून त्याला 10 वर्षाचा मुलगा आहे. किरणला त्याच्या पत्नीने सहा वर्षांपूर्वीच घटस्फोट दिलेला असलायची माहिती समोर येत आहे. किरणमुळे गेली अनेक त्याच्या कुटुंबियांना त्रास होत असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधींना दिली.  एकूणच किरण गोसावी हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असल्याचे एबीपी माझाच्या शोधमोहीम येथून समोर आले आहे. असे असताना एन सी बी किरण गोसावीला मुख्य साक्षीदार म्हणून सांगत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेला आणि फरार म्हणून घोषित असलेला एक आरोपी एन सी बी सारख्या केंद्रीय यंत्रणेसाठी मुख्य साक्षीदार बनू शकतो का, एन सी बी च्या अधिकाऱ्यां ऐवजी आर्यन खानला क्रूज वरून एनसीबी कार्यालयात घेऊन येऊ शकतो का, तसेच एनसीबीच्या कस्टडीत असताना त्याच्या सोबत सेल्फी काढू शकतो का असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget