एक्स्प्लोर

Anjangaon Statue Issue : अंजनगाव पुतळा प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी 6 आरोपींना अटक

Anjangaon Statue Issue : माढा तालुक्यातील अंजनगाव पुतळा प्रकरणात (Anjangaon Statue Issue) शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

Anjangaon Statue Issue सोलापूर : माढा तालुक्यातील अंजनगाव पुतळा प्रकरणात (Anjangaon Statue Issue) पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. अंजनगावला पुतळा पाठवणाऱ्या बाळराजे आवारेचा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना पोलिसांनी सील केला होता. तसेच या प्रकरणात आतापर्यंत आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तर आता या प्रकरणी 6 आरोपींना (Crime News) अटक करण्यात आली आहे. माढा तालुक्यातील अंजनगाव पुतळा प्रकरणात (Anjangaon Statue Issue) शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, अंजनगाव येथे जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना कामात अडथळा आणल्याप्रकरणी हि अटक करण्यात आली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील हाके यांचे सहकारी शिवम वाघमोडे, बाळू वाघमोडे, सतीश वाघमोडे, बंडू वाघमोडे, अरुण वाघमोडे, नितीन वाघमोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी हे अंजनगाव येथील स्थानिक ग्रामस्थ आहेत, अशी देखील माहिती आहे.

Anjangaon Statue Issue : शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी 6 आरोपींना अटक

दरम्यान, पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी या आधीच 12 आरोपीना पोलिसांनी अटक केली असून त्यातील 10 जण अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. मौजे अंजनगाव तालुका माढा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्याप्रकरणी दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी पासून गावामध्ये तणाव निर्माण झाला होता. गावातील दोन्ही समाज एकमेकांसमोर आंदोलनाकरिता बसले होते. अशावेळी प्रशासनाने जागेची मोजणी करून घेण्याबाबत समन्वय्याने तोडगा काढला होता. परंतु मोजणी करताना मोजणी अधिकारी यांच्या कामात हस्तक्षेप करून कामात अडथळा आणल्या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Anjangaon Crime News: अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

शिवम भारत वाघमोडे वय -27 रा. अंजनगाव ता.माढा जि- सोलापूर

बाळू नवनाथ वाघमोडे वय- 31 रा.अंजनगाव ता.माढा जि- सोलापूर.

सतीश हनुमंत वाघमोडे वय- 25 रा.अंजनगाव ता.माढा जि- सोलापूर.

बंडू दिगंबर वाघमोडे वय - 35 रा.अंजनगाव ता.माढा जि- सोलापूर.

अरुण सुभाष वाघमोडे वय 32 रा.अंजनगाव ता.माढा जिल.सोलापूर.

Anjangaon Crime: विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार

सोलापूर जिल्ह्यात विनापरवाना पुतळा (Statue) उभारल्यास थेट एफआयआर (FIR) दाखल करून 4 तासात पुतळा हटवणार, असा मोठा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यासह विनापरवाना उभारण्यात आलेल्या पुतळ्याची माहिती लपवल्यास सात दिवसात पोलीस पाटलाचे निलंबन देखील होणार असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील (Solapur News) विनापरवाना उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यांच्या (Statue Issue) प्रकरणावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे सीईओ यांचे संयुक्त परिपत्रक जारी करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget