एक्स्प्लोर

Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश

Solapur Statue Issue : सोलापूर जिल्ह्यात विनापरवाना पुतळा (Statue) उभारल्यास थेट एफआयआर (FIR) दाखल करून 4 तासात पुतळा हटवणार, असा मोठा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

Solapur Statue Issue सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात विनापरवाना पुतळा (Statue) उभारल्यास थेट एफआयआर (FIR) दाखल करून 4 तासात पुतळा हटवणार, असा मोठा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यासह विनापरवाना उभारण्यात आलेल्या पुतळ्याची माहिती लपवल्यास सात दिवसात पोलीस पाटलाचे निलंबन देखील होणार असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील (Solapur News) विनापरवाना उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यांच्या (Statue Issue) प्रकरणावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे सीईओ यांचे संयुक्त परिपत्रक जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, घटनेची पूर्वकल्पना न दिल्यास ग्रामपंचायत सदस्यांच्या विरोधात देखील अपत्रतेचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. मागील महिन्याभरात सोलापूर जिल्ह्यात विना परवानगी बसवण्यात आलेल्या पुतळा प्रकारनंतर प्रशासनाकडून हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे अलीकडे घडलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांच्या प्रकरणावरून सोलापूर जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलत थेट कारवाईचे निर्देश दिले आहे.

Solapur Statue Issue: परवानगी असल्याशिवाय कोणाला ही पुतळा देऊ नये, अन्यथा कारखाना होणार सील

मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही महापुरुषाचा पुतळा बसवण्यासाठी 9 नियम आणि अटी देखील प्रशासनाच्यावतीने जाहिर करण्यात आल्या आहेत. यामध्ये जागेची मालकी, ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीचा ठराव, पोलिसांचा अहवाल, कला संचनालयचे अहवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत पत्र, अशा कागदपत्रांची गरज असणार आहे. मात्र, अशा पद्धतीने परवानगी न घेता पुतळा बसवल्यास कारवाईचा इशारा या परिपत्रकाद्वारे देण्यात आलाय. तर अनधिकृत पुतळा बसवल्याची ठिकाणी माहिती मिळताच 1 तासाच्या आत उपविभागीय अधिकारी, पोलीस, तहसीलदार यांनी भेट देणे बंधनकारक करण्यात आलाय. विशेष म्हणजे पुतळा तयार करणाऱ्या कारखानदारांनी अधिकृत परवानगी असल्याशिवाय कोणाला ही पुतळा देऊ नये, अन्यथा कारखाना सील करण्यात येईल. असा इशारा देखील यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिलाय.

Solapur News : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव!

माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे महापुरुषाच्या अनाधिकृत पुतळ्यावरून झालेल्या वादानंतर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बैठक घेऊन प्रशासनाला महापुरुषांच्या अनाधिकृत पुतळ्यांबाबत तोडगा काढण्यासाठी कानमंत्र दिला होता. ज्या ठिकाणी असे महापुरुषांचे अनाधिकृत पुतळे बसविण्यात आलेले आहेत त्या गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन असे पुतळे कायदेशीर परवानगी देऊन बसविण्यात यावेत. यासाठी प्रशासनाने एक ते दोन महिन्यात या सर्व परवानगी मिळवून देण्यास मदत करावी आणि ग्रामस्थांनी अनाधिकृत बसविलेले पुतळे आधी स्थलांतरित करावेत आणि नंतर परवानगी घेऊन या पुतळ्याची वाजत गाजत स्थापना करावी, अशा पद्धतीचे मॉडेल पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.

त्यानुसार जिल्हाधिकारी कार्तिकेएन एस आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जिल्ह्यात बसविलेल्या अनाधिकृत पुतळ्यांबाबत संबधित गावकऱ्यांची चर्चा सुरू करण्यात आली आहे. त्याचे पहिले यश पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे पाहण्यास मिळाले. या ठिकाणी बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन काढला आणि रीतसर परवानगीसाठी कागदपत्र दाखल करण्यास सुरुवात केली. यानंतर मोडलिंब येथे आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता यानंतर दोन दिवसापूर्वी त्याच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा अज्ञातांनी बसविला होता.

 इतर महत्वाच्या बातम्या

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget