एक्स्प्लोर

Ambernath Crime News: दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...

Ambernath Crime News: अंबरनाथ पश्चिमेतील लादी नाका परिसरात राहणारी सकीना कुरेशी आपल्या सात वर्षांचा मुलगा हुसनैन कुरेशी सह राहत होती.

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये सात वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या प्रियकराने मुलाच्या डोक्यावर वरवंट्याने (Ambernath Crime News) मारा करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू (Ambernath Crime News) झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. अंबरनाथ पश्चिमेतील लादी नाका परिसरात राहणारी सकीना कुरेशी आपल्या सात वर्षांचा मुलगा हुसनैन कुरेशी सह राहत होती. प्राथमिक माहितीनुसार, तिचे विकास सिंग याच्यासोबत प्रेम संबंध होते.(Ambernath Crime News)

Ambernath Crime News: मुलामुळे दोघांच्या संबंधांमध्ये अडथळा येत असल्याने...

पोलीस तपासानुसार, मुलामुळे दोघांच्या संबंधांमध्ये अडथळा येत असल्याने विकास सिंग याने हुसनैनला मारण्याचा प्लॅन केला. या प्लॅननुसार त्याने मुलाच्या डोक्याचा घाव करून मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या हुसनैनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच पहाटे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी विकास सिंगला अटक केली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, घटनेमागील आणखी कारण आणि इतर पैलूंचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना का देण्यात आली नाही आणि मुलाची आई सकीना कुरेशी हिने घटनाक्रम लपवण्याचा प्रयत्न केला का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या अमानुष घटनेने अंबरनाथमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास अंबरनाथ पोलीस करत आहेत.(Ambernath Crime News)

Ambernath Crime News:  लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती

तर एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लादी नाका परिसरात राहणारी सकीना कुरेशी ही तिचा प्रियकर विकास सिंह याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तिच्यासोबत सात वर्षांचा मुलगा हुसनैन कुरेशीही राहत होता. हुसनैन घरात असल्यामुळे दोघांच्या खासगी आयुष्यात वारंवार अडथळा येत असल्याचा राग विकासच्या मनात होता. त्याच संतापातून त्याने चिमुकल्या हुसनैनवर अमानुष अत्याचार केला. वरवंट्याने त्याच्या डोक्यावर वार करत गुप्तांगासह शरीराच्या विविध भागांवर बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेतील हुसनैनला प्रथम उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच पहाटे त्याची प्राणज्योत मालवली.

Ambernath Crime News: आईने घडलेला प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला...

या घटनेनंतर आरोपी विकास सिंह आणि बालकाची आई सकीना कुरेशी हिने घडलेला प्रकार लपवण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी सांगितले की, आरोपी विकास सिंह याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या गुन्ह्यात बालकाची आई सकीना हिचा कोणताही सहभाग किंवा आरोपीला मदत होती का, या दृष्टीनेही पोलीस सखोल तपास करत आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget