एक्स्प्लोर

धक्कादायक! पाठलाग करणाऱ्या पतीचा मंगळसूत्र चोरट्यांनी दगडाने ठेचला चेहरा ; अकोल्यातील घटनेने खळबळ

या घटनेने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Akola Crime: अकोल्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर येतीये.. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र  चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला मंगळसूत्र चोरट्यांनी बेदम मारहाण करीत पूर्ण चेहरा दगडाने ठेचून काढलाय.. अकोल्यातल्या रेल्वे स्थानकाजवळील ही घटना आहे.. (Akola Crime) राज्यात गुन्हेगारीने कळस गाठलाय. किरकोळकरणातून मारहाण, दिवसाढवळ्या होणारे खून, दहशत वाजवण्याचा प्रयत्न, चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अकोल्यात पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला रविवारी रात्री ( 16 मार्च) चोरट्यांनी फोडून काढले. बेदम मारहाण तर केलीच पण त्याचा चेहरा दगडाने ठेचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ आहे. या व्यक्तीची सध्या प्रकृती चिंताजनक आहे.

नक्की घडले काय? 

अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर मंगळसूत्र चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला होता... त्यानंतर महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी मंगळसूत्र चोरट्यांचा पाठलाग केला. याच दरम्यान चोरट्यांनी गावंडे यांना बेदम मारहाण केली, इतकेच नाही तर त्यांचा चेहरा देखील दगड ठेचून काढलाय.. काल रात्री(16मार्च )उशिरा अकोला रेल्वेस्थानक परिसरात ही घटना घडली.. सद्यस्थितीत हेमंत गावंडे यांचे प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर भेट देत पाहणी केली.. तसेच मंगळसूत्र चोरट्याच्या शोधार्थ पथक गठीत कले असून रवाना केले. दरम्यान या घटनेने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित होतोय? रेल्वे स्थानक परिसरात एवढी मोठी घटना घडते, त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण होतो आहे.

मुंबईत दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून

राजधानी मुंबईत नेहमीच गुन्हेगारीच्या घटनांनी शहर हादरून जातं, कधी भाईगिरी, कधी अंमली पदार्थ तर कधी हत्येच्या घटनांनी मुंबई (Mumbai) महाराष्ट्राचं लक्ष वेधते. आता, येथील मीरा भाईंदरच्या उत्तन परिसरात 75 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या वयोवृद्धाचा मृतदेह झाडाझुडुपात आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली असून पोलिसांनी (Police) गतीने तपास सुरू आहे. या प्रकरणी नायगावमध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीसह तिच्या 17 वर्षीय मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
Pune Crime News : अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget