Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, 215 कोटींच्या खंडणीप्रकरणी आरोपपत्र दाखल
Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. 215 कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. 215 कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला माहिती होती की, सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) खंडणी वसुल करणार आहे. त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED - Enforcement Directorate) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर आरोपपत्र दाखल केलं आहे. ईडीने 215 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आरोपी असल्याचं म्हटलं आहे.
जॅकलिनची झाली होती ईडी चौकशी
ईडीने समन्स बजावल्यानंतर जॅकलीन फर्नांडिसची दिल्लीतील ED कार्यालयात चौकशी झाली होती. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आलं आहे. सुकेशकडून महागडी जनावरं गिफ्ट घेणं महागात पडलं आहे. मुंबई विमानतळावर ईडीनं तिला थांबवलं होतं. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी झाली असल्याची माहिती आहे.
सुकेश चंद्रशेखर जॅकलीनला दिली कोटींची भेट
जॅकलीन एका कार्यक्रमासाठी दुबईला जात असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी 5 तारखेला मुंबई विमानतळावर तिला थांबवले होते. सुकेश चंद्रशेखर (Sukesh ChandraShekhar) यांच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं. तल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटोदेखील समोर आला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर जॅकलीन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. दिल्लीच्या तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी ईडीने शनिवारीच आरोपपत्र दाखल केले होते.
जॅकलीनला घोडा आणि मांजर गिफ्ट करणारा सुकेश चंद्रशेखर कोण ?
सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरुतला एक उद्योगपती आहे. सुरुवातीला नोकरी देण्याच्या आमिषाने त्याने अनेकांची फसवणूक केली. 75 जणांचे 100 कोटी रुपये घेऊन त्याने पोबारा केला. निवडणूक आयोगात ओळख असल्याचं सांगून हवं ते चिन्ह मिळवून देण्याचं आमिष त्यानं दाखवलं. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याला 2017 मध्ये अटक केली.