(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांवर समोरून 5 गोळ्या झाडल्या, तीन थेट शरिरात घुसल्या; मग मॉरिस भाईने स्वतःला संपवलं, त्या दीड मिनिटाचा थरार A to Z
Abhishek Ghosalkar Dahisar Firing : अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नावाच्या व्यक्तीने गोळीबार केला असून त्याने स्वतःलाही संपवलं आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचं पुत्र आणि मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Dahisar Firing) यांच्यावर समोरून तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मॉरिस नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी तीन गोळ्या अभिषेक घोसाळकर यांना लागल्या आहेत. एक गोळी अभिषेक घोसाळकरांच्या डोक्यात लागल्याची माहिती असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. गोळ्या झाडणाऱ्याने शेवटी स्वतःवरही गोळी झाडली आणि संपवलं.
फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच गोळी झाडल्या
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती आहे. त्यांच्यात काही वैयक्तिक वाद होते, पण ते मिटल्याने ते एकत्र आले होते. मॉरिसने स्वतःच्या कार्यालयात त्याने अभिषेक घोसाळकर यांना बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांबद्दल कौतुकाचं शब्द वापरल्याचं दिसून येतंय.
पण पुढच्याच क्षणी मॉरिसने अभिषेक घोसाळकरांवर समोरून गोळीबार केला. त्यांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी तीन गोळ्या या घोसाळकरांच्या शरिरात घुसल्या. एक गोळी घोसाळकरांच्या डोक्यात घुसली. एवढं झाल्यानंतर मॉरिनने स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि संपवलं.
पैशाच्या व्यवहारातून गोळीबार झाल्याची माहिती
मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार पैशाच्या व्यवहारातून केला असल्याचं समोर आलं आहे. वर्षभरापूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाला होता. पण आता तो मिटल्याने ते एकत्र आले होते. मॉरिसने अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घालत नंतर स्वतःवरही गोळी झा़डून घेतली.
कोण आहे गोळीबार करणारा मॉरिस? (Who Is Moris)
मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता.
अभिषेक घोसाळकरांची प्रकृती गंभीर
अभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्या असून एक गोळी त्यांच्या डोक्याला लागल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर दहिसरमधील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात गुंडागर्दीचं राज्य?
महाराष्ट्रात सध्या चाललंय तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला पडावा इतक्या भयंकर घटना सध्या या राज्यात घडतायत. कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची आधी पुण्यात त्याच्याच साथीदारांनी दिवसाढवळ्या, भर रस्त्यात हत्या केली. मग कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्थानकातच शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच, मुंबईतल्या दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडून त्यांची आज हत्या करण्यात आली.
ही बातमी वाचा :