एक्स्प्लोर

शॉकिंग! राक्षसी कृत्य; युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकून मारहाण, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून नेटीझन्सने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेतील आरोपींवर मोठी कारवाई करावी, अशीही मागणी केली जात आहे.

पाटणा : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनेकदा माणूसकीला काळिमा फासणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना घडतात. कौटुंबिक हिंसाचारात टोकाची पाऊले उचलल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातच, आता बिहारच्या अररिया येथील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून व्हिडिओ पाहून नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. त्यामध्ये, एका युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या युवकावर बाईक चोरीचा आरोप असल्याचे व्हिडिओतील संवादावरुन दिसून येते. चोरीच्या आरोपातून युवकास पकडल्यानंतर स्थानिकांनी ही शिक्षा दिली. मात्र, त्यांचं हे कृत्य माणूसकीला काळिमा फासणारं असल्याने नेटीझन्कडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशीही मागणी केली जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून नेटीझन्सने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेतील आरोपींवर मोठी कारवाई करावी, अशीही मागणी केली जात आहे.

सोमवार 26 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची (Viral video) खात्री केल्यानंतर याबाबत माहिती दिली. बिहारच्या अररिया येथील ही घटना असून चोरीच्या आरोपात पकडलेल्या युवकासोबत हे कृत्य घडलं आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर, इतरांच्याबाबतीत पोलिसांकडून (Police) तपास सुरू असून कारवाई केली जात आहे, असेही बिहार पोलिसांनी ट्विटर हँडलवरुन माहिती देताना म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवरुन आता विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. विरोधकांनी नितीश कुमार (Nitishkumar) सरकारला प्रश्न विचारत एनडीए सरकारला लक्ष्य केलं आहे. आरजेडी प्रवक्ता मृत्यूंजय तिवारी यांनी म्हटले की, हे कोणतं राज्य आहे, या महाजंगलराजमध्ये महाआरोपी राज कायम आहे. बिहारमध्ये शासन आणि प्रशासनाचा वचक राहिलेला नाही, असेही राजेडीच्या ट्विटर हँडलवरुन म्हटलं आहे. 

बिहारमधील गुंडाराज कधी संपणार?

मृत्यूंजय तिवारी यांनी तालिबानी सरकारची आठवण काढत, नितीशकुमार सरकारवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये चाललंय काय, डबल इंजिन सरकार हे गुंडाराज कधी संपवणार?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. बिहारमध्ये एनडीएचं डबल इंजिन सरकार आहे, त्यामुळे आरोपींचा जयजयकार आहे. राज्यातील अरेरिया येथे घडलेली ही घटना लाजीरवाणी असून अमानवीय असल्याचंही मृत्यूंजय यांनी म्हटले.  

हेही वाचा

दहीहंडीची सुपारी घेतली, साऊंडचं टेस्टिंग जीवावर बेतलं; दोन जण रात्रभर वीजेच्या तारेला चिटकले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ICC Women's T20 World : Tejaswini Pandit Ek Number Movie  : तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला 'येक नंबर' सिनेमाABP Majha Headlines : 11.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra News:विदर्भात महायुतीतले वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे,वळसे पाटलांवर आशिष देशमुखांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
Amol Mitkari: 'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Embed widget