(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Washim News : धक्कादायक! जंगल परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळले दोन मृतदेह; वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा जंगलातील घटना
Washim News : वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपिर आणि मालेगाव तालुक्यातील काटेपूर्णा जंगलात दोन मृतदेह आढळून आले आहे. दोन्हीही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Washim News वाशिम: वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपिर आणि मालेगाव तालुक्यातील काटेपूर्णा जंगलात आज वेगवेगळ्या ठिकाणी दोन मृतदेह आढळून आले आहे. दोन्हीही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या दोन्ही घटनानां घातपाताची किनार असल्याची चर्चाही जिल्ह्यात रंगू लागली आहे. घटनेची माहिती मिळताच मंगरुळपिर पोलीस (Washim Police) घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सध्या सुरू केली आहे. तर त्यातील एका मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दूसरा मृतदेह अधिक कुजलेल्या अवस्थेतील असून केवळ हाडाचा सापळा शिल्लक राहीला असल्याने अद्याप या मृतदेहाची ओळक पटलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जंगल परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळले दोन मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, यातील एक मृतदेह हा वाशिमच्या मंगरूळपिर तालुक्यातील जनुना खुर्द येथील 36 वर्षीय विठ्ठल खुळे या तरुणाचा असल्याची माहिती पुढे आली आहे. दोन महिन्यापूर्वी घरगुती वादातून खुळे हे आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर आज त्यांचा मृतदेह काटेपूर्णा जंगल परिसरात एका झाडाला लटकून आणि कुजलेल्या अवस्थेत आढळून आलाय. तर मालेगाव तालुक्यातील जोगलदरीच्या जंगलामध्ये दूसरा कुजलेल्या अवस्थेतील हाडाचा सापळा असलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अनेक चर्चेला उधाण
तर दुसरीकडे वाशिम जिल्ह्याच्या जोगलदरी येथील 15 वर्षीय बालक शिवदास गोदमले गेल्या काही दिवसापासून गायब आहे. शिवदास हा 1 एप्रिल 2024 रोजी घरुन नेहमीप्रमाणे आपल्या घरचे दोन बैल घेऊन त्यांना चारण्यासाठी जोगलदरी शेतशिवारात घेऊन गेला. मात्र, संध्याकाळी बैलजोडी घरी परतली, मात्र त्यासोबत शिवदास काही घरी परतला नव्हता. त्यामुळे हा मृतदेह शिवदास या बालकाचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर काही अज्ञातांनी शिवदासचा घातपात घडवुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून अनेक चर्चेला सध्या उधाण आलंय.
या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस करत असून एकाच दिवशी दोन मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता आज या घटनेमुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागले आहेत. जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न नागरिक सध्या उपस्थित करू लागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या