एक्स्प्लोर

धक्कादायक! नांदेडमधील जोडप्याची हत्येपूर्वी काढली गावातून धिंड; खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारात ऑनर किलिंगची ही घटना घडली होती, ⁠नको त्या अवस्थेत मुलीला सासरच्यांनी पकडले होते.

नांदेड : जन्मदात्यानेच आपल्या लेकीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड (Nanded) जिल्ह्यात उघडकीस आला होता. या घटनेतील आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आला असून सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या धक्कादायक व्हिडिओत हत्या करण्यात आलेल्या प्रेमी युगुलांची हत्या करण्यापूर्वी हात बांधून गावातून काढण्यात आल्याचं दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी वडिलांनीच विवाहित मुलगी व तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकल्याची घटना घडल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. ऑनर किलींगच्या या घटनेनं नांदेड जिल्हा हादरुन गेला. आता ह्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून गावातून हातात दोरी बांधून मुलीची व मुलाची धिंड काढण्यात आल्याचं दिसून येत आहे. 

नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारात ऑनर किलिंगची ही घटना घडली होती, ⁠नको त्या अवस्थेत मुलीला सासरच्यांनी पकडले होते. विवाहित प्रेयसीच्या सासरी भेटायला गेलेल्या प्रियकराला सासरच्या मंडळींनी नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले होते.  त्यानंतर मुलीचे वडील, काका व आजोबांनी मुलीची सासरीच गावातून धिंड काढली. याप्रकरणी, ⁠मुलीचे आजोबा, काका आणि वडिलांना 5 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. 

जन्मदात्याने आपल्या विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराला मारहाण करून, जीव घेऊन, हात-पाय बांधून विहिरीत ढकलून दिल्याची खळबळजनक घटना 2 दिवसांपूर्वी समोर आली होती. नांदेड जिल्ह्यातील गोळेगाव, (ता. उमरी) येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन घटनेची माहिती दिली आहे, मुलीचा मृतदेह आधी हाती लागला, तर मुलाचा मृतदेह सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास विहिरीतून बाहेर काढला.

लपूनछपून या दोघांच्या गाठीभेटी, बोलणं सुरूच

मिळालेल्या माहितीनुसार संजीवनी कमळे (19, रा. गोळेगाव) व लखन बालाजी भंडारे (19, रा. बोरजुनी) असे या घटनेतील मयत तरुण व तरुणीचे नाव आहे. बोरजुनी येथील मूळचे रहिवासी असलेल्या या दोघांचे गेल्या काही वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते. गेल्या वर्षी संजीवनी हिचा विवाह गोळेगाव येथील एका तरुणासोबत झाला होता. तरीही लपूनछपून या दोघांच्या गाठीभेटी, बोलणं सुरूच होतं. त्यांच्या प्रेमाला मुलीच्या आई-वडिलांचा विरोध होता. रात्री उशीरा दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मयत तरुणीचे वडील, काका, पती, सासू-सासरे आदींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा

मनोज जरांगे मुंबईकडे, ओबीसी नेते नागपुरात; आरक्षण आंदोलनावर CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget