एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: कुर्ला बस अपघातात 7 ठार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, BMC आणि बेस्टला महत्त्वाचा आदेश

Devendra Fadnavis Kurla Best Bus Accident: कुर्ला बस अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींचा उपचारांचा खर्च महापालिका आणि बेस्टच्यावतीने करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत.

मुंबई: कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये काल (सोमवारी 9 डिसेंबर) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने शिरलेल्या इलेक्ट्रिक बेस्ट बसने (Kurla Best Bus Accident) अनेकांना धडक दिली. या अपघातामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 48 ते 50 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सदर बस जवळपास 8 ते 10 वाहनांना उडवत मार्केट परिसरात गेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे, घटनेचा तपास सुरू आहे, तर जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

त्याचबरोबर या घटनेत मृत कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. फडणवीसांनी याबाबत सोशल मिडिया एक्सवरती पोस्ट लिहून घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे, तर जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट काय?

कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

अजित पवारांची पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे, पोस्टमध्ये त्यांनी, 'कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात एस जी बर्वे रोड येथे भरधाव बेस्ट बसनं अनेक लोकांना चिरडल्याची तसंच या अपघातात काहींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सर्वांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल', असं म्हटलं आहे.

अंजली दमानियांनी उपस्थित केला सवाल

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेवर सवाल उपस्थित करत, 'निःशब्द ! दोष कुणा कुणाला द्यायचा ? पूर्ण सिस्टम सडलेली आहे,' अशी पोस्ट शेअर केली आहे. 

प्रकरण नेमकं काय?

कुर्ला एलबीएस रोडवर बेस्ट बसने अनेकांना उडवल्याची घटना काल घडली आहे. अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

सदर अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी प्रवास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बस चालक संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडला आहे. तसेच या अपघातानंतर जमावाने बस चालकाला बेदम मारहाण केल्याचं देखील व्हिडीओद्वारे समोर आलं आहे. अपघात घडल्यानंतर बस चालक संजय मोरे याला नागरिकांकडून मारहाण करण्यात आली. यावेळी पोलिसांनी धाडस दाखवत संजय मोरेला बाहेर काढलं आणि पोलीस स्थानकात घेऊन गेले.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार; राहुल गांधी सांत्वनासाठी जाणार, शिवसेना, भाजपचे मंत्रीही आज पोहचणार!
परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार; राहुल गांधी सांत्वनासाठी जाणार, शिवसेना, भाजपचे मंत्रीही आज पोहचणार!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Chitrarath : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :23 डिसेंबर 2024: ABP MAJHAPune Wagholi Accident : वाघोलीत फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं; दुर्घटनास्थळावरून आढावाTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 23 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार; राहुल गांधी सांत्वनासाठी जाणार, शिवसेना, भाजपचे मंत्रीही आज पोहचणार!
परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार; राहुल गांधी सांत्वनासाठी जाणार, शिवसेना, भाजपचे मंत्रीही आज पोहचणार!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Raksha Khadse : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
Tuljapur : धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
LIC Policy Maturity Claim : LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
Embed widget