एक्स्प्लोर

Mumbai Airport : अंतवस्त्रात लपवून आणलेले तस्करीचे 32 किलो सोनं मुंबई विमानतळावर पकडलं; दोन परदेशी महिलांना अटक

Mumbai Airport : परदेशातून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन परदेशी महिलांना कस्टम विभागाने अटक केली आहे. या कारवाईत बॅग आणि अंतवस्त्रात लपवून आणलेले तस्करीचे तब्बल 32.69  किलो सोनं जप्त करण्यात आले आहे.

Mumbai Airport Gold Seized : मुंबईमधून एका मोठ्या कारवाईची बातमी समोर आली आहे. सक्त वसुली संचालनालय अर्थात कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. यात परदेशातून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन परदेशी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. बॅग आणि अंतवस्त्रात लपवून आणलेले तस्करीचे तब्बल 32.69  किलो सोनं मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) कस्टम विभागाने पकडलंय. या प्रकरणी दोन परदेशी महिलांना अटक करण्यात आलीय.  जप्त करण्यात आलेल्या या सोन्याची किंमत तब्बल 19 कोटी 15 लाख इतकी असल्याची माहिती कस्टम विभागाच्या (Customs Department) अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या पोलीस आणि कस्टम विभागाचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणा मुंबई विमानतळावर अधिक सतर्क झाले आहे. 

अंतवस्त्रात लपवून आणलेले तस्करीचे 32 किलो सोनं 

झटपट पैसे कमावण्याच्या नादात अनेक जण गैरप्रकारांचा मार्ग अवलंबत. बहुदा काहीवेळ त्यांना यशही येतं. मात्र पोलिसांच्या नजरेतून क्वचितच हे गुन्हेगार सुटत असतात. अशाच एका कारवाईचा पर्दाफाश मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने केला आहे. यात परदेशातून आलेल्या दोन संशयित महिलांना कस्टम विभागाने ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता, त्यांनी छुप्या पद्धतीने  बॅग आणि अंतवस्त्रात लपवून आणलेले तस्करीचे तब्बल 32.69  किलो सोनं मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने पकडलंय. या प्रकरणी दोन्ही विदेशी महिलांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सध्या केली जात आहे.

16 उंटाची अवैध वाहतूक, तीन जणांवर गुन्हा दाखल

अशीच एक तस्करीची घटना आज हिंगोली जिल्ह्यातून पुढे आली आहे. यात उंटाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांना कारवाई करण्यात यश मिळालं आहे. या प्रकरणी आयशर चालकासह एक वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आयशरमधून 16 उंटाची निर्दयपणे वाहतूक केली जात होती. पोलिसांनी कारवाई करत 16 उंटांची सुटका केली आणि आरोपींनी ताब्यात घेतलं. तस्करीसाठी निर्दयीपणे उंटांची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. 

21 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त 

आखाडा बाळापूर पोलिसांच्या वतीनं रात्रगस्तीचं काम सुरू असताना हिंगोली नांदेड रोडवर एका आयशर मधून 16 उंटाची वाहतूक केली जात असल्याचा समोर आले हे उंट कत्तलीसाठी घेऊन जात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी 21 लाख रुपयाचा मुद्देमालासह वाहन चालकासह उंट आणि आयशर  ताब्यात घेतला आहे  याप्रकरणी आकडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली-नांदेड रोडवर जरोडा शिवारातील टोल नाक्यावर एका आयशरमधून उंटाची वाहतूक केली जात होती, पोलिसांच्या तपासणी दरम्यान हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मध्य प्रदेश येथील आरोपीसह एकूण तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणारे हात वंचित, अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतिक्षेत
आम्ही पण तुमच्या लाडकी बहिणी.. कष्टाचे पैसे द्या, योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची सरकारकडे मागणी
IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 at 8AM Superfast 25 December 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याTuljapur News : तुळजानगरी भाविकांंनी गजबजली, सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी भाविक तुळजापुरात #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 25 December 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 25 December 2024 माझा गाव, माझा जिल्हा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणारे हात वंचित, अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतिक्षेत
आम्ही पण तुमच्या लाडकी बहिणी.. कष्टाचे पैसे द्या, योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची सरकारकडे मागणी
IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
Embed widget