एक्स्प्लोर

ISI Terrorists Arrested : पुणे आयसिस प्रकरणातील तीन 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवादी अटकेत, दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला; अयोध्या राम मंदिरासह प्रमुख मंदिरं ISIS च्या निशाण्यावर

ISIS Terrorists Arrested : पुण्यातून फरार तीन दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यांच्या चौकशीत आयसीसच्या मोठा कट उघडकीस आला आहे.

Delhi Police Action : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (Delhi Police Special Cell) “मोस्ट वॉन्टेड” (Most Wanted) दहशतवादी मोहम्मद शाहनवाज आलम (Mohammed Shahnawaz Alam) आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. हे तिन्ही संशयित दहशतवादी पुणे आयसिस (ISIS) मॉड्यूलमधील फरार आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ पाळत ठेवल्यानंतर शोध मोहिम आणि देशभरात 200 हून अधिक ठिकाणी छापेनंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला संशयित दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलं आहे.

पुणे आयसिस मॉड्युलमधील तीन दहशतवादी अटकेत

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दहशतवादी शाहनवाजने पोलीस चौकशीदरम्यान अनेक खुलासे केले आहेत. पुणे आयसिस प्रकरणातील वाँटेड आरोपींची माहिती देणाऱ्यांना एनआयएकडून प्रत्येकी तीन लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. मोहम्मद शाहनवाज शफी उझिमा आलम, रिझवान अब्दुल, अब्दुल्ला फयाज शेख आणि तल्हा खान अशी संशयित दहशवाद्यांची नावे आहेत.

एनआयएचे पथक दिल्लीला रवाना

ISIS चा मोठा कट उधळला

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले तिन्ही दहशतवादी गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार फरतुल्ला गौरी याच्या संपर्कात असून, हा संपूर्ण कट पाकिस्तान आणि आयएसआयकडून रचला जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी ऑनलाइन आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे तरुणांना कट्टरपंथी बनवतात आणि नंतर त्यांना दहशतवादी हल्ल्यांसाठी तयार करत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

पुण्यातील छापेमारीदरम्यान दहशतवाद्यांनी काढला पळ

एनआयएने आलमला “मोस्ट वॉन्टेड” घोषित करण्यात आलं होतं. या वर्षी जुलैमध्ये पुण्यातील छापेमारीदरम्यान आलमने पळ काढला होता. यानंतर त्याच्या अटकेसाठी एनआयए (NIA - National Investigation Agency) 3 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं. विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी सांगितलं की, आलम आणि त्याचे सहकारी - अर्शद वारसी आणि मोहम्मद रिजवान अश्रफ इंजिनीअर आहेत. हे तिघे जामिया मिलिया इस्लामियामधून पीएचडी करत आहेत.

पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतंय

शाहनवाजवर ISIS मॉड्यूलशी संबंध असल्याचा आरोप आहे. चौकशीदरम्यान त्याने गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार फरतुल्ला गौरी आणि त्याचा जावई शाहिद फैसल यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं असून तो पाकिस्तानमध्ये आयएसआयच्या आश्रयाने राहत असल्याचं उघड झालं आहे. त्याच्या सांगण्यावरून आलमसह तिन्ही दहशतवादी दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होते. शहानवाज आलम पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून दिल्लीत लपून बसला होता. त्याच्यावर तीन लाख रुपयांचं बक्षीस होतं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget