फक्त 20000 रुपये पगार असूनही तुम्ही बनू शकता करोडपती, कसं कराल नियोजन?
तुम्हाला कमी पगार (Payment)असेल तर तुम्ही करोडपती होऊ शकता का? तर याच उत्तर हो असं आहे. तुम्हाला फक्त योग्य ठिकाणी योग्य वेळी गुंतवणूक करावी लागेल.
How to Become Crorepati : अलीकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment) महत्व चांगलच वाढलं आहे. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करणं महत्वाचं आहे. दरम्यान, तुम्हाला कमी पगार (Payment)असेल तर तुम्ही करोडपती होऊ शकता का? तर याच उत्तर हो असं आहे. तुम्हाला जर फक्त 20000 रुपये पगार असेल तरीदेखील तुम्ही करोडपती बनू शकता. फक्त योग्य नियोजन करणं महत्वाचं असतं. जाणून घेऊयाक करोडपती बनण्यासंदर्भातील माहिती.
जर तुम्हाला दरमहा 20,000 रुपये मिळत असतील आणि तुम्हाला 1 कोटी रुपयांचा निधी तयार करायचा असेल तर काय करावं लागेल? त्यासाठी करोडपती बनण्याचा सर्वोत्तम फॉर्म्युला म्हणजे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळेल. या संपूर्ण कालावधीत तुम्हाला चांगला व्याजावर व्याज मिळेल. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात कराल तितका फायदा तुम्हाला मिळेल.
करोडपती कसे बनू शकता?
तुम्हाला 2000 रुपये पगार आहे. या पगारातील 15 टक्के भाग म्हणजे 3000 रुपयांची प्रत्येक महिन्यात बचत करा. या 3000 रुपयांची तुम्ही SIP मध्ये गुंतवणू करा.
3000 रुपयांची गुंतवणूक दिर्घ मुदतीत करा. म्हणजे 30 वर्ष गुंतवणूक करावी.
या गुंतवणुकीवर तुम्हाला 12 टक्के व्याज मिळेल. याचा मोठा फायदा तुम्हाला होईल.
30 वर्षात तुमची गुंतवणूक ही 10 लाख 80, 000 रुपये होईल, तर या रकमेतून तुम्हाला परतावा हा 9509741 रुपये मिळतील. म्हणून 30 वर्षानंतर तुम्हाला एकूण रक्कम ही 1 कोटी 5 लाख 89 हजार 741 रुपये मिळेल. अशा प्रकारे तुम्ही करोडपती होऊ शकता. फक्त यासाठी दिर्घ मुदतीत गुंतवणूक करावी लागेल. दिग्घ मुदतीत गुंतवणूक केली तर तुम्हाला मोठा फायदा मिळतो.
अनेकांना वाटते की, आपल्याला मिळणाऱ्या पैशातून (Money) काहीतरी रक्कम बचत करावी. कारण गुंतवणुकीचं ( investment), बचतीचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी आत्तापासून गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तुम्हालाही करोडपती व्हायचं असेल तर योग्य ठिकाणी योग्य वेळी गुंतवणूक करावी लागते. तुम्ही अशा काही ठिकाणी गुंतवणूक करावी जिथे अधिक रक्कम परतावाच्या स्वरूपात मिळेल. यामध्ये म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही Mutul Funds मध्ये एकरकमी किंवा दर महिन्याला पैसे गुंतवू शकता. यामाध्यमातून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो.
महत्वाच्या बातम्या:
Millionaire Formula: करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती