राम मंदिराला मिळालं जगातील सर्वात महागडं रामायण, नेमकी किंमत किती? या रामायणात खास काय?
Ramayana : राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात महागडे रामायण अयोध्येतील राम मंदिराला भेट देण्यात आलं आहे. या रामायणाची किंमत 1.65 लाख रुपये आहे.
Most Expensive Ramayana : राम मंदिर (Ram mandir) उद्घाटन सोहळा दोनच दिवसावर आला आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात महागडे रामायण अयोध्येतील राम मंदिराला भेट देण्यात आलं आहे. या रामायणाची किंमत 1.65 लाख रुपये आहे.
महागड्या रामायणाची किंमत किंमत 1.65 लाख रुपये
राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अनेक वस्तू राम मंदिरात येत आहेत. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडत आहे. अशीच एक खास गोष्ट अयोध्या राम मंदिरापर्यंत पोहोचली आहे. ही गोष्ट म्हणजे रामायण आहे. या रामायणाला जगातील सर्वात महागडे रामायण म्हटले जात आहे. ज्याची किंमत 1.65 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे रामायण पुस्तक विक्रेते मनोज सती यांनी आणले आहे. सध्या हे जगातील सर्वात सुंदर आणि महागडे रामायण असल्याची माहिती मनोज सती यांनी दिली.
#WATCH | Uttar Pradesh: Ramayana worth Rs 1,65,000 displayed in Ayodhya. The weight of the Ramayana is 45 kg and it comes in three boxes. (19.01) pic.twitter.com/WbEsOCpQcZ
— ANI (@ANI) January 20, 2024
या रामायणात नेमकं खास काय?
अत्यंत खास सामग्रीसह तयार करण्यात आलेल्या या रामायणाची रचनाही बांधकामाधीन राम मंदिरासारखीच आहे. ज्यामध्ये तीन मजले बांधले जात आहेत. रामायणाची बाहेरची पेटी तयार करण्यासाठी अमेरिकन अक्रोड लाकडाचा वापर करण्यात आला आहे. कव्हरमध्ये आयात केलेले साहित्य वापरण्यात आले आहे. तर जपानमधील सेंद्रिय शाईचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या रामायणात वापरलेला कागद हा फ्रान्सचा आहे. जे पूर्णपणे अॅसिड मुक्त आहे. हा एक प्रकारचा पेटंट पेपर आहे. हा कागद फक्त या पुस्तकासाठी वापरला असून बाजारात उपलब्ध नाही. या रामायणाच्या प्रत्येक पानाला वेगळी रचना देण्यात आली आहे. जेणेकरून वाचकांना अधिक चांगला अनुभव घेता येईल. अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह हे रामायण आहे. त्यामुळं हे खास रामायणा असल्याची माहिती मनोज सती यांनी दिली.
हे रामायण जवळपास 400 वर्षापर्यंत टिकू शकते
मनोज सती यांनी दिलेल्या माहितीनुसार हे रामायण जवळपास 400 वर्षापर्यंत टिकू शकते. त्याचे मुखपृष्ठही अतिशय सुंदर आहे. यासाठी कपाटही तयार करण्यात आले आहे. जेणेकरून ते वर्षानुवर्षे सुरक्षित ठेवता येईल. पुढील चार पिढ्या हे पुस्तक वाचू शकतात. मनोज सतीने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमचे सुंदर रामायण घेऊन अयोध्येत पोहोचलो आहोत. यात अनेक गुण आहेत आणि हे जगातील सर्वात महागडे रामायण आहे. हे जगातील सर्वात सुंदर रामायण आहे.
महत्त्वाच्या बातम्या: